आपले-परके कविता-गीत (SAD SONG)-आज मी माझी लढाई हरलो, आपल्याच लोकांत मी परका ठरलो

Started by Atul Kaviraje, January 28, 2023, 03:03:26 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला एक, आपले आणि परके कविता-गीत (SAD SONG)   ऐकवितो. "बेगाना बेगाना, अपनों में मैं, बेगाना बेगाना"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपली नवं-वर्षाची ही शनिवार-दुपार आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे -(बेगाना बेगाना, अपनों में मैं, बेगाना बेगाना)
---------------------------------------------------------

             "आज मी माझी लढाई हरलो, आपल्याच लोकांत मी परका ठरलो !"
            ----------------------------------------------------------

आज मी माझी लढाई हरलो,
आपल्याच लोकांत मी परका ठरलो !

आज मी माझी लढाई हरलो,
आपल्याच लोकांत मी परका ठरलो !
माझं अस्तीत्व शोधता शोधताच,
आपल्यांतच मी बेगाना झालो !

मी वेडा होतो, मी मूर्खच होतो
मी नादान होतो, मी नासमझच होतो
मला वाटलं मी सर्वांचाच मन राखलं
मला वाटलं मी सर्वांनाच जिंकलं,
     पण मला हे सारं उशिरा कळलं,
     हे स्वार्थी जग मला नाही फळलं.

वाटलं माझी सावली देईल साथ मजला
माझ्यासोबत असेल ती नेहमीच साथीला
पण आज तिनेही माझी साथ सोडलीय
एकटा टाकून मला तीही निघून गेलीय,
     आज माझ्या बरोबर तीही नाही,
     आपल्यांची अपेक्षा करणं योग्यच नाही.

एकेकाळी जमाना वेगळा होता
माझं नूर उंच ढगातला होता
एकेकाळी जमाना माझा होता
माझा सूर उच्च स्वरातला होता,
     आज माझा तो सूर हरवलाय,
     माझे गाणे बेसूर करून गेलाय.

आज काट्याने वेढलंय माझं मन
आज रक्तबंबाळ झालंय माझं मन
डोळ्यातून झरझर अश्रू वाहताहेत
हे असं कसं घडलं मला विचारताहेत,
      माझ्यापाशी याचे नाहीय उत्तर,
      मी झालोय सर्वथा निरुत्तर.

असं वाटतंय या हृदयात स्पंदन नाही
असं वाटतंय या जीवात जIनच नाही
एखाद्या मढयागत जीवन जगायचे
भावनाहीन, जगण्याला अर्थच नाही,
     का असं घडलं माझ्याबरोबर,
     हा नशिबाचा दोष होता का खरोखर ?

जगाला ठोकरावेसे मला वाटतंय
स्वतःला मिटवावेसे मला वाटतंय
जगण्यात मला स्वारस्यच नाही उरलंय
मरण्याचं कारणं आता मला मिळालंय,
     हताशI, निराशाच माझ्या नशिबी,
     इथे मी ठरलोय हतभागी, कमनशिबी.

आज मी माझी लढाई हरलो,
आपल्याच लोकांत मी परका ठरलो !
माझं अस्तीत्व शोधता शोधताच,
आपल्यांतच मी बेगाना झालो !

आज मी माझी लढाई हरलो,
आपल्याच लोकांत मी परका ठरलो !

आज मी माझी लढाई हरलो,
आपल्याच लोकांत मी परका ठरलो !

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-28.01.2023-शनिवार.
=========================================