मला आवडलेला निबंध-निबंध क्रमांक-107-गौतम बुद्ध

Started by Atul Kaviraje, January 28, 2023, 09:46:00 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                 "मला आवडलेला निबंध"
                                    निबंध क्रमांक-107
                               -----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला निबंध", या निबंध-मालिकेतील एक महत्त्वाचा निबंध. या निबंधाचे शीर्षक आहे- "गौतम बुद्ध"

     आजच्या या लेखात आपण गौतम बुद्ध यांच्यावर मराठी निबंध मिळवणार आहोत. माझे आवडते संत गौतम बुद्ध आहेत हा gautam buddha essay in marathi शाळा कॉलेज च्या सर्व विद्यार्थ्यांना उपयुक्त आहे तर चला निबंध पाहूया..

     महात्मा बुद्ध यांना शांती व अहिंसेचे दैवत मानले जाते. ज्या काळात संपूर्ण भारतात हिंसा, अशांती, अंधविश्वास आणि अधर्म वाढला होता तेव्हा भगवान बुद्धांनी अवतरीत होऊन सर्व लोकांना बंधनातून मुक्त केले. महात्मा बुद्ध एक युग प्रवर्तक होते ज्यांनी न केवळ भारतात परंतु संपूर्ण विश्वात आपल्या ज्ञानाने ज्योत पेटवली. त्यांना 'लाईट ऑफ आशिया' म्हणूनही संबोधले जाते.

     भगवान बुद्धांचा जन्म इसवी सन पूर्व 569 मध्ये लुंबिनी नावाच्या एका स्थानावर झाला. ते कपिलवस्तू चे राजा शुद्धोधन यांचे पुत्र होते व त्यांचे जन्म नाव सिद्धार्थ होते. जन्माच्या वेळीच ज्योतिषांनी सिद्धार्थ मोठे झाल्यावर महान संत किंवा एक महान सम्राट बनणार अशी भविष्यवाणी केली होती. राजकुमार असल्याने लहानपणापासून त्यांना राजसी सुखसुविधा उपलब्ध झाल्या होत्या. परंतु सिद्धार्थ विरक्त स्वभावाचे होते. शुद्धोधन राजांनी त्यांचा विवाह यशोधरा नावाच्या एका सुंदर राजकुमारीशी करून दिला. नंतर च्या काळात त्यांना राहुल नावाचा एक मुलगा झाला.

     सिद्धार्थ यांचे मन आजूबाजूच्या गोष्टी पाहून फार प्रभावित होत असे. एकदा महालातून बाहेर पडल्यावर त्यांनी एक म्हातारा, एक आजारी व्यक्ती व एक मृत प्रेत पाहिले. हे सर्व दुःख पाहिल्यावर त्यांच्या लक्षात आले की जीवनातील सुखं भौतिक वस्तूंच्या उपभोगणे मिळवता येत नाही. एका रात्री सर्वजण झोपलेले असताना ते महाल सोडून पडाले. त्या वेळी त्यांचे वय 29 वर्षे होते.

     त्यांनी आपले राजसी वस्त्र त्यागून संन्यास धारण केला व अनेक वर्षे कठीण तपश्चर्या केली. या गहन साधनेत लीन असताना निरंजना नदीच्या तीरावर एका पिंपळाच्या झाडाखाली बसलेले असताना त्यांना साक्षात्कार प्राप्त झाला. परम ज्ञानाची प्राप्ती करून ते समाधीत लीन झाले. बुद्धांनी ज्या वृक्षाखाली ज्ञानाची प्राप्ती केली त्या वृक्षाला 'बोधीवृक्ष' म्हटले जाते.

     वैशाख शुक्ल पौर्णिमेच्या दिवशी सिद्धार्थ यांना ज्ञान प्राप्त झाले व ते सिद्धार्थ चे गौतम बुद्ध बनले. यानंतर सारनाथ येथे त्यांनी आपला पहिला उपदेश दिला. बुद्धांची प्रवचने ऐकुन लोक प्रभावित होऊ लागले. हळू हळू राजा महाराज, सेठ आणि जन साधारण बौद्ध धर्माचे पालन करून त्यांच्या चांगल्या गोष्टी आचरणात आणू लागले. बुद्धांनी आपल्या धर्माचा प्रसार पाली भाषेत केला. ते वस्तूंच्या संग्रहाला पाप मानत असत.

     आज जगभरात बौध्द धर्माला मानणाऱ्या लोकांची संख्या भरपूर आहे व बौद्ध देशही अनेक आहेत. सम्राट अशोक यांनी ही बौद्ध धर्म स्वीकारून त्याच्या प्रचार प्रसारात महत्त्वाचे योगदान दिले. म्हणून आपल्यालाही भगवान बुध्दांच्या शिकवणीला आत्मसात करून आपले जीवन यशस्वी बनवायला हवे.

--लेखक-मोहित पाटील
--------------------

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-भाषण मराठी.कॉम)
                   -------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-28.01.2023-शनिवार.
=========================================