विरह कविता-गीत-प्रियतमे, आज मी मजबूर झालोय, तुझ्या आयुष्यातून दूर दूर चाललोय !

Started by Atul Kaviraje, January 29, 2023, 05:38:59 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला एक, विरह कविता-गीत (SAD SONG) ऐकवितो. "तेरी दुनिया से हो के मजबूर चला, मैं बहुत दूर, बहुत दूर, बहुत दूर चला"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपली नवं-वर्षाची ही सांज-रविवार आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे -(तेरी दुनिया से हो के मजबूर चला, मैं बहुत दूर, बहुत दूर, बहुत दूर चला)
--------------------------------------------------------------------------

         "प्रियतमे, आज मी मजबूर झालोय, तुझ्या आयुष्यातून दूर दूर चाललोय !"
        ---------------------------------------------------------------

प्रियतमे, आज मी मजबूर झालोय,
तुझ्या आयुष्यातून दूर दूर चाललोय !

प्रियतमे आज मी मजबूर झालोय,
तुझ्या आयुष्यातून दूर दूर चाललोय !
निराशेनेच मज घेरलंय आज
हताशा माझ्या पदरी पडलीय आज,
     असहाय्य मी, एकटाच चाललोय,
     एकलेपणाचे दुःख मी पिऊ लागलोय !

तुझ्या जगातून मी इतका दूर चाललोय
की परतुनी येणे आहे कठीण
माझी मंजिल मला बोलावतेय खरी
पण तिथे पोचणेही आहे कठीण,
     माझी मजबुरी मी नाही सांगू शकत,
     पावले नेतील तिथे ओढत चाललोय !

अश्रूंची झालीय दाटी माझ्या डोळ्यांत
दुःख भरलंय काठोकाठ माझ्या मनात
निग्रहाने आज मी माझे अश्रू पितोय
दुःखे मनातल्या मनातच सहतोय,
     केव्हातरी केला होतI मी तुझ्याशी वादI, 
     त्या वायद्यांना निभावायचा प्रयत्न करू लागलोय !

जिथे असशील तिथे खुश राहा तू
तुझे नवीन जग तुला मुबारक, प्रिये
आज माझा रस्ता वेगळा आहे
तुझ्या जगापासून मी दूर दूर जात आहे,
     बस काहीही नेत नाहीय, तुझ्या आठवणींशिवाय,
     तुझ्या आठवणींतच मी दिवस गुजारू लागलोय !

प्रियतमे, आज मी मजबूर झालोय,
तुझ्या आयुष्यातून दूर दूर चाललोय !

प्रियतमे, आज मी मजबूर झालोय,
तुझ्या आयुष्यातून दूर दूर चाललोय !

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-29.01.2023-रविवार.
=========================================