मला आवडलेला लेख-लेख क्रमांक-83-गप्पा गणितज्ञाशी !

Started by Atul Kaviraje, January 29, 2023, 08:54:08 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                   "मला आवडलेला लेख"
                                      लेख क्रमांक-83
                                  ---------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला लेख" या शीर्षकI-अंतर्गत, एक महत्त्वाचा, अभ्यासपूर्ण आणि ज्ञानवर्धक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "गप्पा गणितज्ञाशी !"

                                 गप्पा गणितज्ञाशी ! --
                                -----------------

डॉ. आचार्य लॅपटॉप उघडून डॉक्टर व पेशंट यांच्यातील संवादाची चित्रफीत दाखवू लागले.

बाई: डॉक्टर हे औषध माझ्यासाठी चांगले आहे का?
डॉक्टर: (शांतपणे) तुम्ही किती वर्ष वैद्यकीय शिक्षण घेतले आहे?
बाई: (गोंधळून) काहीच नाही.
डॉक्टर: मी पाच वर्षे मेडिकलचा अभ्यास केला आहे. त्यानंतर 2 - 4 वर्ष हॉस्पिटलमध्ये काम केले आहे. व गेली 10 वर्षे मी येथे प्रॅक्टीस करत आहे. मी वैद्यकीय क्षेत्रात नवीन काही घडत असल्यास त्याकडे बारकाईने लक्ष ठेवतो. माझे या विषयीचे ज्ञान अद्यावत आहे. त्यामुळे तुमच्या आरोग्यासाठी काय हवे काय नको हे मला कदाचित तुमच्यापेक्षा जास्त कळते. जर तुम्ही सुचविलेले औषध चांगले असते तर मी तुम्हाला सांगितले नसते का?
बाई: परंतु टीव्हीच्या जाहिरातीत.....
डॉक्टर: जर तुमचा उपचार जाहिरात करत असल्यास तुम्ही खुशाल त्या जाहिरातदाराकडे जा व तुमची प्रकृती दाखवा.

डॉ. आचार्य लॅपटॉप बंद करत "आजकाल डॉक्टर्स इतके निष्ठुरपणे बोलत नाहीत हेही तितकेच खरे. कारण शेवटी त्यांना धंदा करायचा असतो. औषधी कंपन्या त्यांना चारत असतात." असे म्हणाले.

"अजून कुठल्या जाहिरातीमुळे हे तुमचे मत झाले आहे?"

"काही जाहिराती उघड उघड फसवत असतात. जाहिरातीवरची किंमत एक असते व प्रत्यक्ष विकत घेतानाची किंमत भलतीच असते. असे का म्हणून विचारल्यानंतर काही थातुर मातुर कारण सांगून खिसा रिकामा करतात. इंटरनेट प्रोव्हैडर्स जाहिरात करताना 100 mbps - 200 mbps स्पीड्स असे काही तरी जाहिरात करत असतात. प्रत्यक्ष डाउनलोड - अपलोड करताना हे स्पीड्स 20 ते 200 kbps असतात. (व यासाठीसुद्धा भरमसाट दर ठेवलेले असतात.) अशी जाहिरात करणारे खरोखरच सचोटीने व्यवहार करत असल्यास सत्य परिस्थती सांगून ग्राहकांचा विश्वास संपादन करू शकतात. परंतु या सर्वाना दिशाभूल करण्याची सवय जडलेली आहे.

टूथब्रश, टूथपेस्ट, सॅनिटरी नॅपकिन्स, मोटर सायकली, बाथरूम - संडास स्वच्छ करण्यासाठी लागणारे लिक्विड्स, गोरेपणा, केस गळण्याचे थांबविणारे - केस भरगच्च वाढविणारे -केस चमकदार व मुलायम बनविणारे तेल-क्रीम्स, इत्यादींच्या उबग आणणाऱ्या जाहिराती बघत असताना तुम्हा लोकांना कंटाळा का येत नाही? राग का येत नाही? ज्या प्रकारे अशा मालांची जाहिरात केली जाते त्यावरून तरी या मालांवर बहिष्कार टाकायला हवे. थंड पेय पिण्यासाठी 200 - 300 मीटरवरून उडी का म्हणून मारायला हवे? लोहचुंबकाची पट्टी वापरून मानदुखी कशी काय कमी होवू शकते? अशी हजारो उदाहरणं देता येतील. "

डॉक्टर पुन्हा एकदा लॅपटॉप उघडून अजून एका मासलेवाइक जाहिरातीची चित्रफीत दाखवू लागले.

जाहिरात करणारी बाई: उघड्या पायानी चालत असल्यास काचेचे तुकडे वा काटे टोचल्यामुळे पाय दुखू लागतात...
ग्राहक महिला: हो खरच की....
जा.क.बा.:तुमच्या पायाला भेगा पडतात. रक्त येते. पू भरू लागते. डॉक्टरी उपचार करावे लागतात. हॉस्पिटलमध्ये अ‍ॅड्मिट व्हावे लागते. काही वेळा तुमचा पाय कापावा लागतो.
ग्रा.म. : आई ग ! खरं की काय ? मग काय करायला हवे?
जा.क.बा.: आमच्या कंपनीचे बूट वापरा. सुरक्षित व आरामाचे जीवन जगा....
ग्रा.म : धन्यवाद! मी आजच बूट आणते व झोपेच्या वेळीसुद्धा बूट घालूनच झोपते..

--प्रभाकर नानावटी
(February 28, 2013)
-----------------------

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-mr.उपक्रम.ऑर्ग)
                    ------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-29.01.2023-रविवार.
=========================================