विरह-गीत-तुझ्या आठवणीत गंगा जमुना वाहताहेत, तुझ्या सोबतच्या आठवणी त्या सांगताहेत

Started by Atul Kaviraje, January 29, 2023, 10:58:20 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला एक, विरह-आठवणी कविता-गीत ऐकवितो. "मेरे नैना सावन भादों, फिर भी मेरा मन प्यासा"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपली नवं-वर्षाची ही निशा-रविवार आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे -(मेरे नैना सावन भादों, फिर भी मेरा मन प्यासा)
---------------------------------------------------------

  "तुझ्या आठवणीत गंगा जमुना वाहताहेत, तुझ्या सोबतच्या आठवणी त्या सांगताहेत !"
------------------------------------------------------------------------

तुझ्या आठवणीत गंगा जमुना वाहताहेत,
तुझ्या सोबतच्या आठवणी त्या सांगताहेत !

तुझ्या आठवणीत गंगा जमुना वाहताहेत,
तुझ्या सोबतच्या आठवणी त्या सांगताहेत !
अश्रू त्या आठवणींना किनारा देताहेत,
जगण्यास त्या एक सहारा देताहेत !

वेड्या मना हा कुठला खेळ आहे
जो माझ्यासोबत खेळला जातोय
या गीतात कोणते कारुण्य भरलेय,
ज्यात मी आकंठ बुडून जातोय.

हे दुःख गाणेच माझी साथ करतंय
हे आपसूकच माझ्या ओठांवर येतंय 
विसरलो तरी विसरता येत नाहीत,
भूतकाळातल्या आठवणी जाता जात नाहीत.

तेव्हाची गोष्ट आता जुनी झालीय
ती केवळ आता कहाणी बनलीय
आठवतI आता ती आठवत नाही,
आठवणींच्या जंजाळात ती गुंतत राही.

ऋतू आले, ऋतू गेलेही
बहार आली, बहार गेलीही
एक अदम्य उत्साह होता तेव्हा,
मनात एक उमंग होती तेव्हा.

साराच मोहर गळून पडलाय
पानगळीचा सर्वत्र सडाच पडलाय
ऋतू केव्हा येतात ते नाही कळत,
ऋतू जातात केव्हा तेही नाही कळत.

मनाला आता खोटं सांगावं लागतं
मनाचं खोटं समाधान करावं लागतं
पुन्हा परतुनी नाही येणार ते दिन,
गेले ते दिन, गेले ते दिन.

कित्येक वर्षे लोटून गेलीत
स्मरणात आता नाहीत ती राहिलीत
तुझ्या माझ्या प्रेमाच्या आठवणी,
आता कालप्रवाहात वाहून गेलीत.

केव्हातरी लख्खकन वीज चमकते
तुझ्या आठवणींना उजाळा देते
केव्हातरी ढगांची गर्जना होते,
तुझी धडधड मला नकळत जाणवते.

तुझ्या माझ्या विरहाचा आज
केव्हाच झालाय असह्य भूतकाळ
आठवणींचे भूत आजही मानगुटी बसतंय,
त्या आठवणी काढून मला ते भिववतय. 

साऱ्या अIशा केव्हाच मावळल्यात
निराशाच साऱ्या जीवनात उगवल्यात
आता मनानेही ते स्वीकारलंय,
तुझ्या विरहात तेही तयार झालंय.

तरी आजही एक आशेचा किरण
चमकून जातो, आभास देतो
तू आहेस आजही माझ्या सोबत,
तो मला खोटा भास देतो.

या आठवणींचं माझी सोबत करतील
आयुष्यभर त्या साथ देतील
नशिबाला दोष देऊन उपयोग नाही,
तुझ्या आठवणीच यापुढंही मला जगवतील.   

तुझ्या आठवणीत गंगा जमुना वाहताहेत,
तुझ्या सोबतच्या आठवणी त्या सांगताहेत !

तुझ्या आठवणीत गंगा जमुना वाहताहेत,
तुझ्या सोबतच्या आठवणी त्या सांगताहेत !
अश्रू त्या आठवणींना किनारा देताहेत,
जगण्यास त्या एक सहारा देताहेत !

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-29.01.2023-रविवार.
=========================================