प्रेम-नशिबाची कविता-गीत (SAD SONG)-आज प्रेमाने असं खेळवलंय,आज नशिबाने मला हरवलंय

Started by Atul Kaviraje, January 30, 2023, 10:56:41 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला एक, प्रेम-नशिबाची कविता-गीत (SAD SONG) ऐकवितो. "कैसे कहें हम, प्यार ने हमको, क्या क्या खेल दिखाये"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपली नवं-वर्षाची ही निशा-सोमवार आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे -(कैसे कहें हम, प्यार ने हमको, क्या क्या खेल दिखाये)
---------------------------------------------------------------

               "आज प्रेमाने असं खेळवलंय, आज नशिबाने मला हरवलंय !"
              -----------------------------------------------------

आज प्रेमाने असं खेळवलंय,
आज नशिबाने मला हरवलंय !

आज प्रेमाने असं खेळवलंय,
आज नशिबाने मला हरवलंय !
नशीबच आहे माझ्यावर नाराज इथे,
मी स्वतःला नशिबावर सोपवलंय.

पानगळ लुटून जाते बागेला
बहर गळून जातो जणू उमेदीचा
तेच माझ्या नशिबी आलंय,
माझा सरतI काळ जणू आनंदाचा.

मृत्यू हेच अंतिम सत्य असतं
इथे मला प्रेमातच मरण आलंय
जीवन मला मिथ्या भासतंय,
अर्ध्यावरच ते मला सोडून गेलंय.

प्रवासात माझं सार काही हरवलंय
वाटतंय, माझं असं काहीच नाही उरलंय
उरलेलं आयुष्य मला जगतI येईल का ?
नशीब मला ते जगू देईल का ?

लोकहो, तुम्ही नाही जाणत माझ्याबाबत
मित्रानो, तुम्हाला नाही काही माहित
मी काय होत ठरवलं आयुष्यात ?
आणि काय होत माझ्या नशिबात ?

प्रेमाने माझं स्वप्नभंगच केलंIय
प्रेमात माझं गीत बेसूर ठरलंय
मी घेऊन आलो शीत दवाचे बिंदू,
विक्राळ ज्वाळांनी मला आज पोळलंय.

माझ्याकडे सर्व काही होतं तेव्हा
माझ्याकडे काय नव्हतं तेव्हा ?
मी सर्व काही पाहिलं होतं तेव्हा,
सर्व काही भोगत आहे मी आता.

सनईचे सूर दुरून ऐकू येत आहेत
ते लग्न-गीत लांबून कुणी गात आहे
तरी माझ्यापर्यंत ते पोहोचत राही,
मला ते सुखाने झोपू देत नाही.

प्रेमाने मला डागण्या दिल्याचं आहेत
आता माझेही मला सतावत आहेत
आता कुणावर रडावं प्रश्न पडतोय,
की नशिबावर हसावं हाही प्रश्न पडतोय.

आता तुम्हीच एक काम करा, मित्रानो
मला बंदिवासात ठेवा, मित्रानो
तिथेच मला माझा सुकून मिळेल,
जिथे मी कसा सुखाने झोपेन.

काही पर्यायच नाही उरलाय आता
प्रेमही गेलंय विरुद्ध माझ्या
त्यात नशिबाचाही रोष आहे माझ्यावर,
काय अवस्था झालीय माझी कात्रीत सापडल्यावर.

आज प्रेमाने असं खेळवलंय,
आज नशिबाने मला हरवलंय !

आज प्रेमाने असं खेळवलंय,
आज नशिबाने मला हरवलंय !
नशीबच आहे माझ्यावर नाराज इथे,
मी स्वतःला नशिबावर सोपवलंय.

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-30.01.2023-सोमवार.
=========================================