बदनाम शायरचे दुःखी-गीत-हा शायर बदनाम ठरलाय, त्याच्याच मैफिलीत नाकाम झालाय !

Started by Atul Kaviraje, January 31, 2023, 05:37:05 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला एक, बदनाम शायरचे दुःखी-गीत (SAD SONG) ऐकवितो. "मैं शायर बदनाम, हो मैं चला, मैं चला"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपली नवं-वर्षाची ही मंगळवार-संध्याकाळ आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे -(मैं शायर बदनाम, हो मैं चला, मैं चला)
--------------------------------------------------

              "हा शायर बदनाम ठरलाय, त्याच्याच मैफिलीत नाकाम झालाय !"
             --------------------------------------------------------

हा शायर बदनाम ठरलाय,
त्याच्याच मैफिलीत नाकाम झालाय !

हा शायर बदनाम ठरलाय,
त्याच्याच मैफिलीत नाकाम झालाय !
एकेकाळी गाजत होती महफिल,
आज तिथेच तो अनोळखी झालाय !

हा शायर बदनाम ठरलाय,
स्वतःच्याच मैफिलीत परका झालाय
जिथे होत होती वाहवा गाण्याची,
आज तिथेच तो बेसूरI ठरलाय !

माझ्या घरून तुम्हाला काही सामान मिळेल
जोडलेलं नाही तर तुटक फुटकच मिळेल
जे आजवर कधीच साधलं नव्हतं,
जे उद्याही कधीच नाही सांधेल.

या कवीचा एक जुनाट दिवाण मिळेल
या शायरची मोडलेली आलमारी मिळेल
शिवाय एक महत्त्वाची गोष्टही मिळेल,
जिला मी जीवनात प्रथम स्थान दिलेलं.

होय मित्रांनो, बरोबर ओळखलंत तुम्ही
एक जुनाट रिकामा मदिरेचा ग्लासही
जो मी आयुष्यभर होता सांभाळला,
जो मी जीवापाड होता जपला.

आज माझी पावले पोळली गेलीत
चालून चालून तिची शकले झालीत
काटे तर माझी शय्याच आहे,
मऊ गादीचे मला सुख कोठे आहे ?

जीवनाची माझ्या हीच आहे कहाणी
ओठात गाणी, तर डोळ्यांत आहे पाणी
आतल्याआत रडायला मला जमत नाही,
डोळ्यातले पाणी निरंतर वाहत राही.

करायचे होते खूप काही
आजही राहिलेय ते बाकी
पण तेही आज सोडून जावं लागतंय,
तेही आज अर्ध्यावरच राहतंय.

माझा रस्ता कुणीतरी रोखीत आहे
मला जाण्यास मज्जाव करीत आहे
थोडीशी धुगधुगी अजुनी शिल्लक आहे,
थोडासा जीव आजही घुटमळत आहे.

हृदय तर आधीच तूटलंय, मित्रांनो
जोडता येतं का तेच पाहतोय
इच्छा उरल्यात का तेच शोधतोय, 
पूर्तता होईल का तेच पाहतोय.

जीवना, तुझ्याकडून आता काही नको
लोकहो, तुमच्याकडून मला काहीही नको
तुम्हा सर्वांना माझा शेवटचा नमस्कार,
या मैफिलीचे मी बंद करतोय दार.

हा शायर बदनाम ठरलाय,
त्याच्याच मैफिलीत नाकाम झालाय !

हा शायर बदनाम ठरलाय,
त्याच्याच मैफिलीत नाकाम झालाय !
एकेकाळी गाजत होती महफिल,
आज तिथेच तो अनोळखी झालाय !

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-31.01.2023-मंगळवार.
=========================================