३१-जानेवारी-दिनविशेष

Started by Atul Kaviraje, January 31, 2023, 08:48:28 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-३१.०१.२०२३-मंगळवार.जाणून घेऊया,आजच्या दिवसाचे "दिनविशेष"

                                  "३१-जानेवारी-दिनविशेष"
                                 -----------------------

-: दिनविशेष :-
३१ जानेवारी
=========================================
अ) महत्त्वाच्या घटना:
   ----------------
१९५०
राष्ट्रपती म्हणून डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी संसदेपुढे पहिले भाषण केले. यापूर्वी ते घटना समितीचे अध्यक्ष होते.
१९५०
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष हॅरी एस. ट्रूमन यांनी हायड्रोजन बॉम्ब बनवण्याच्या योजनेस मान्यता दिली.
१९४९
बडोदा व कोल्हापूर ही संस्थाने (तत्कालीन) मुंबई राज्यात विलीन झाली.
१९४५
युद्धातुन पळ काढल्याबद्दल एडी स्लोव्हिक या सैनिकाला अमेरिकेने मृत्यूदंड दिला. दुसर्‍या महायुद्धाच्या काळात युद्धातुन पळून गेलेल्या एकूण ४९ सैनिकांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती मात्र फक्त स्लोव्हिकच्याच शिक्षेची अंमलबजावणी झाली.
१९२९
सोविएत रशियाने लिऑन ट्रॉटस्की याला हद्दपार केले.
१९११
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 'मूकनायक' या पाक्षिकावी सुरूवात
१९२०
स्वातंत्र्यवीर सावरकर यांना दुसर्‍या जन्मठेपेची शिक्षा झाली. तत्कालीन ब्रिटिश साम्राज्यात दोनदा जन्मठेपेची शिक्षा झालेले ते एकमेव आहेत.
=========================================
ब) जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  -----------------------------
१९७५
प्रीती झिंटा – चित्रपट अभिनेत्री व उद्योजिका
१९३१
गंगाधर महांबरे – गीतकार कवी व लेखक
(मृत्यू: २३ डिसेंबर २००८)
१८९६
दत्तात्रय रामचंद्र बेन्द्रे तथा 'अंबिकातनयदत्त' – कन्नड कवी, पद्मश्री (१९६८), त्यांच्या 'नाकु तंती' या काव्यसंग्रहास १९७३ मधे ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला.
(मृत्यू: २१ आक्टोबर १९८१)
=========================================
क) मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
    -------------------------
२००४
व्ही. जी. जोग – व्हायोलिनवादक
(जन्म: २२ फेब्रुवारी १९२२)
२००४
सुरैय्या जमाल शेख ऊर्फ 'सुरैय्या' – गायिका व अभिनेत्री
(जन्म: १५ जून १९२९)
२०००
के. एन. सिंग
कृष्ण नारायण तथा के. एन. सिंग – हिन्दी चित्रपटांतील गाजलेले खलनायक, भालाफेक आणि गोळाफेक यातही ते निष्णात होते. १९३६ च्या बर्लिन ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याची त्यांना संधी मिळाली होती. परंतु बहिणीच्या प्रकृतिअस्वास्थ्यामुळे ते त्यात भाग घेऊ शकले नाहीत.
(जन्म: १ सप्टेंबर १९०८ - डेहराडून, उत्तराखंड)
२०००
वसंत कानेटकर – नाटककार
(जन्म: २० मार्च १९२०)
१९९५
सुरेश शंकर नाडकर्णी – बँकिंग तज्ञ, 'रोखे बाजार नियामक मंडळाचे' (SEBI) चे अध्यक्ष, पद्मभूषण
(जन्म: ? ? ????)
१९९४
वसंत जोगळेकर – मराठी व हिन्दी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक
(जन्म: ? ? ????)
१९८६
विश्वनथ मोरे – संगीतकार
(जन्म: ? ? ????)
१९७२
महेन्द्र – नेपाळचे राजे
(जन्म: ? ? ????)
१९६९
अवतार मेहेरबाबा – आध्यात्मिक गुरू, मौनव्रती संत, त्यांनी सलग ४४ वर्षे मौनव्रत पाळले होते.
(जन्म: २५ फेब्रुवारी १८९४ - पुणे, महाराष्ट्र)
१९५४
ई. एच. आर्मस्ट्राँग – एफ. एम. रेडिओचे संशोधक
(जन्म: १८ डिसेंबर १८९०)
=========================================

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-31.01.2023-मंगळवार.
=========================================