मला आवडलेला निबंध-निबंध क्रमांक-110-झाडे लावा झाडे जगवा

Started by Atul Kaviraje, January 31, 2023, 09:06:15 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                 "मला आवडलेला निबंध"
                                    निबंध क्रमांक-110
                                ----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला निबंध", या निबंध-मालिकेतील एक महत्त्वाचा निबंध. या निबंधाचे शीर्षक आहे- "झाडे लावा झाडे जगवा"

     "वृक्ष वल्ली आम्हां सोयरीं वनचरें" संत तुकारामांनी आपल्या या अभंगात वृक्षापासून आपल्याला होत असलेले फायदे सांगितले आहेत.

     झाडे हि निसर्गाद्वारे मनुष्याला मिळालेली अमूल्य भेट आहेत, म्हणून आपण सर्वानी झाडांचे संरक्षण आपले कर्तव्य समजायला हवे. आजच्या या लेखात आपण झाडे लावा झाडे जगवा या विषयावर मराठी भाषण किंवा निबंध मिळवणार आहोत.

     झाड है आपल्या पृथ्वीवर निसर्गाने मनुष्याला दिलेली अमूल्य भेट आहे. मनुष्याला जीवन जगण्यासाठी झाड अतिशय महत्त्वपूर्ण साधन आहेत. मनुष्यच नाही तर पृथ्वीवरील सर्वच जीवजंतूना जीवन जगण्यासाठी वृक्ष महत्त्वाची भूमिका बजावतात. झाडे आपला खूप साऱ्या नैसर्गिक आपत्यापासून बचाव करतात. एका तऱ्हेने ते आपले पालन पोषण करत असतात. झाडे आपली पृथ्वी आणि पर्यावरणाला स्वच्छ ठेवण्याचे काम करतात. म्हणून आपल्याला देखील झाडांच्या संरक्षणासाठी पूर्ण जवाबदार आणि जागरूक बनायला हवे.

     लहान झाडांपेक्षा लांब आणि परिपक्व झाडे जास्त उपयोगाचे असतात. घनदाट झाडे कार्बन डायऑक्साइड चांगल्या प्रमाणात शोषतात, पावसापासून संरक्षण देतात, मोठी सावली उपलब्ध करवून देतात आणि उष्णतेचा ताप कमी करतात. एका 'एक एकर' जागेत लावलेले झाड 20 लोकांसाठी एक वर्षाचा ऑक्सिजन तयार करतात. ज्या ठिकाणी जास्त झाडे असतात तेथे थंडी आणि गर्मी दोघेही ऋतु नियंत्रित राहतात, अतिवृष्टी आणि अती उष्णता देखील झाडांमुळे टाळता येते.

     झाडे ही सूर्याच्या अल्ट्रावायलेट किरणांना पृथ्वीवर येण्यापासून रोकतात. ज्या ठिकाणी जास्त झाडे असतात तेथील ओझोन लेयर चांगल्या प्रमाणात असतो. या शिवाय झाडे आपल्याला अन्न जसे फळ भाज्या, लाकूड, औषधी इत्यादी अनेक गोष्टी देतात. झाडे वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, जल प्रदूषण व मृदा प्रदूषण कमी करण्यात उपयुक्त आहेत.

     झाडांचे इत्यादी अनेक फायदे असल्याने आपण त्यांचे मूल्य समजायला हवे. आपण झाडे तसेच जंगलांना कापायला नको व कोणी असे करत असेल तर त्याला रोखायला हवे. अधिकाधिक लोकांना झाडे लावण्यासाठी आणि वृक्षतोंड रोखण्यासाठी प्रेरित करायला हवे.

--लेखक-मोहित पाटील
--------------------

                  (साभार आणि सौजन्य-संदर्भ-भाषण मराठी.कॉम)
                 -------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-31.01.2023-मंगळवार.
=========================================