एकलेपणावर कविता-गीत-कुणीही नाही सहारा द्यायला, कुणीही नाही माझं म्हणायला !

Started by Atul Kaviraje, January 31, 2023, 10:43:08 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला एक, एकलेपणावर कविता-गीत (SAD SONG) ऐकवितो. " कोई हमदम न रहा, कोई सहारा न रहा, हम किसी के न रहे, कोई हमारा न रहा"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपली नवं-वर्षाची ही मंगळवार-रजनी आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे -(कोई हमदम न रहा, कोई सहारा न रहा, हम किसी के न रहे, कोई हमारा न रहा)
--------------------------------------------------------------------------

                 "कुणीही नाही सहारा द्यायला, कुणीही नाही माझं म्हणायला !"
                -----------------------------------------------------

कुणीही नाही सहारा द्यायला,
कुणीही नाही माझं म्हणायला !

कुणीही नाही सहारा द्यायला,
कुणीही नाही माझं म्हणायला !
कुणीही नाही माझं इथे,
मी नाही कुणाचाही इथे !

आज मित्र म्हणवणारा कुणी नाही
खांद्यावर हात ठेवणारा कुणी नाही
प्रेमाने विचारणारा कुणी नाही,
काळजी वाहणारा कुणी नाही.

संध्याकाळ अशी उदास वाटतेय
मनात ती दाटून राहतेय
उत्साहाचा वारा साफ पडलाय,
अमंगळच ती सांगून जातेय.

या सायंकाळी मी एकटा आहे
अशा कातरवेळी मी उभा आहे
संध्या-छाया मज भिववीत आहेत,
कभिन्न आकृत्या मला सतावीत आहेत.

माझा कुणीही सहप्रवासी नाहीय
माझा हमसफरही कुणीही नाहीय
जो तारा मला दाखवीत होता मार्ग,
तोही आज अस्तास गेलाय.

हे निसर्गा, तूच होतास माझा मित्र
हे निसर्गा, तूच होतास माझा साथीदार
यापुढील भेटीस साशंक आहे मी,
तुझा सहवास कदाचित येथेच संपणार.

माझं तेव्हा कुणीही नव्हतं झालं
आजही नाही कुणी माझं आपलं
वाट पाहून मनाने आशा सोडलीय,
निराशेनेच मला जखडून ठेवलंय.

पावले नेतील तिथे मी जातो
कळत नाही, मी ओढतच चालतो 
दिशा नाही, मंजिल नाही,
सुरुवात नाही, शेवटही नाही.

वाटतं कुणीतरी मला बोलावेल
वाटतं कुणीतरी मला इशारा करील
पण ते सारं मृगजळच असतं,
तिथे तेव्हा कुणीही नसतं.

कुणीही नाही सहारा द्यायला,
कुणीही नाही माझं म्हणायला !

कुणीही नाही सहारा द्यायला,
कुणीही नाही माझं म्हणायला !
कुणीही नाही माझं इथे,
मी नाही कुणाचाही इथे !

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-31.01.2023-मंगळवार.
=========================================