विरह कविता-गीत-प्रत्येक वळणावर वळून पाहतोय, तुझ्या आवाजाची प्रतीक्षा करतोय !

Started by Atul Kaviraje, February 01, 2023, 04:38:49 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला एक, विरह कविता-गीत ऐकवितो. "हज़ार राहें, मुड़ के देखीं, कहीं से कोई सदा ना आई"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपली नवं-वर्षाची ही बुधवार-दुपार आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे -(हज़ार राहें, मुड़ के देखीं, कहीं से कोई सदा ना आई)
---------------------------------------------------------------

           "प्रत्येक वळणावर वळून पाहतोय, तुझ्या आवाजाची प्रतीक्षा करतोय !"
          ------------------------------------------------------------

प्रत्येक वळणावर वळून पाहतोय,
तुझ्या आवाजाची प्रतीक्षा करतोय !

प्रत्येक वळणावर वळून पाहतोय,
तुझ्या आवाजाची प्रतीक्षा करतोय !
भयाण शांतता आहे प्रत्येक वळणावर,
सावलीही नाही आढळत कुणाची रस्त्यावर.

प्रत्येक वळणावर वळून पाहतोय,
तुझ्या आवाजाची प्रतीक्षा करतोय !
बेवफाईचं होती माझ्या नशिबात,
तुझी वफा चांगलंच पांग फेडतेय.

तुझी माझी झाली होती भेट जिथे
त्या वळणावर मी अजुनी उभा आहे
ती वळणे आहेत तिथेच आहेत,
फक्त तुझ्या पावलांचे ठसेच कायम आहेत.

शोधता तुला कितीतरी वर्षे लोटली
भटकता भटकता पायाला भिंगरी लागली
वाटलं त्याचा वळवणार भेटशील पुन्हा,
पाउलखुणही वाऱ्याने तुझी पुसून टाकली.

तू निघून गेलीस ती गेलीसच
पुनः फिरून नाही पहिलसचं
तुझं दुःख तेव्हा मी घेतलं होतं,
माझं सुख मी तुला दिल होतं.

वाटतंय माझं नशीब तुझं होउदे
तुला माझेच भोग प्रत्ययास येउदे
श्राप नाहीय हा माझ्या मनाचा,
पण माझे दुःख तुला कळूदे.

रात्रभर करवटे होतो बदलत
तुलाही हा अनुभव येउदे
डोळ्यांवरली झोपही उडाली होती,
तुझीही झोप क्षणभर उडुदे.

तुला वाटलं मी तुला हाक देईन
तुला वाटलं मी तुला बोलावीन
पण नाही, मीही आहे मनाचा जिद्दी,
मी नाही कधी परतून येईन.

आज मी ते वळण वळलोय
तुझ्या आवाजाला मी आज टाळलंय
प्रतीक्षेत होतो वर्षानुवर्षे आवाजाच्या,
ते वळण मी आज कायमच सोडलंय.

आजही मला तो भास होतोय
आजही लांबून तुझा आवाज येतोय
ते वळण माझ्या नजरेआड झालंय,
तुझ्या आवाजात आज अंतर पडलंय.

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-01.02.2023-बुधवार.
=========================================