आठवणीवरली कविता-गीत-प्रिये पहा दिवस ढळला, रात्रीने अंधाराचा शालू पांघरला !

Started by Atul Kaviraje, February 05, 2023, 03:28:36 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला एक, आठवणीवरली कविता-गीत ऐकवितो. "दिन ढल जाये हाय, रात ना जाय, तू तो न आए तेरी, याद सताये"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपली फेब्रुवारी महिन्याची ही रविवार-दुपार आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे -(दिन ढल जाये हाय, रात ना जाय, तू तो न आए तेरी, याद सताये)
------------------------------------------------------------------------

                 "प्रिये पहा दिवस ढळला, रात्रीने अंधाराचा शालू पांघरला !"
                ---------------------------------------------------

प्रिये पहा दिवस ढळला,
रात्रीने अंधाराचा शालू पांघरला !

प्रिये पहा दिवस ढळला,
रात्रीने अंधाराचा शालू पांघरला !
तुझ्या आठवणीत दिवस मावळला,
रातकिड्यांचा सूर खावयास उठला !

प्रिये पहा दिवस ढळला,
रात्रीने अंधाराचा शालू पांघरला !
आज सूर्यास्त जरा लवकर झाला,
तुझ्या अनेक आठवणी जागवून गेला !

प्रिये पहा दिवस ढळला,
रात्रीने अंधाराचा शालू पांघरला !
नयन शिणले वाट तुझी पाहता,
आठवणींचा झुला स्वप्नी आंदोलित राहिला !

ज्या हातांनी थIमले होते तुला
कर-झुल्यावर झुलवले होते तुला
रिकामी आहेत आज तेच हात,
मोकळा आहे आज तोच झुला.

प्रेमाची हीच का आहे दुनियादारी
तोच विरह आज आहे भोगांतरी
प्रेम करायचे आणि विसरून जायचे,
मनाला कसेतरी समजावीत राहायचे.

मन घट्ट तरी किती करायचे
मनाला किती मी जोजवIयाचे
तू मात्र मन मानेल तसे वागायचे,
सहज तोडून परके व्हायचे.

अश्याच धारा बरसात होत्या रिमझिम
वेगळीच होती तेव्हा वर्षा-राणीची थीम
असेच होते तुषार तुझ्या गालांवर ओघळलेले,
अन वाहता किंचितसे हनुवटीवर थांबलेले.

चिंब भिजलेला तुझा केश संभार
जल-बिंदू निचोडताना तारंIबळीचI तुझा व्यवहार
मी हसताना रागाचा टाकलेला कटाक्ष,
अन उगा रुसलेले तुझे दोन्ही अक्ष.

वाटतंय हा मोसम रूसलाय आपणांवर
नेहमीचा पाऊस नाही बरसत दोघांवर
आजही तो आठवला की शहारा येतो,
तुझ्या माझ्या प्रेमाची साक्ष देऊन जातो.

रात्र झालीय अन तुझा भास झालाय
तुझा आवाजही कोठूनसI कानी पडलाय
आजही मला त्याने बांधून ठेवलंय,
माझ्या मनाला त्याने मोहून टाकलंय.

तेव्हाही तू माझ्या जवळ होतीस
आजही तू माझ्या जवळच आहेस
जितकी जवळ तितकी दूरही आहेस,
ही दुरीच आपली मजबुरीचं आहे.

दोघेही होतो एकमेकांना सांभाळायला
दोघेही लागलो होतो एकमेकांना ओळखायला
एकमेकांचे रुसवे फुगवे होतो झेलत,
एकमेकांना ठेवत होतो आपण झुलत.

दिवस भासतोय अनोळखी अन रात्र परकी
एकटेपणात तुझी याद येतेय सारखी
आता आपली मन कोण सांभाळणार,
एकट्या मनाची कैफियत कोण ऐकणार.

अजूनही आहे मी तुझ्या प्रतीक्षेत
रात्रही जागून काढू लागलोय
आठवण तुझी झोपू देत नाहीय,
अशात तुझी चाहूलही लागत नाहीय.

प्रिये पहा दिवस ढळला,
रात्रीने अंधाराचा शालू पांघरला !

प्रिये पहा दिवस ढळला,
रात्रीने अंधाराचा शालू पांघरला !
तुझ्या आठवणीत दिवस मावळला,
आठवणींची सवय करतोय मनाला.

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-05.02.2023-रविवार. 
=========================================