मला आवडलेला निबंध-निबंध क्रमांक-115-प्रदूषण एक समस्या

Started by Atul Kaviraje, February 05, 2023, 10:12:09 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                 "मला आवडलेला निबंध"
                                    निबंध क्रमांक-115
                                ----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला निबंध", या निबंध-मालिकेतील एक महत्त्वाचा निबंध. या निबंधाचे शीर्षक आहे- "प्रदूषण एक समस्या"

     आजकाल वाढत असलेल्या महानगरातील समस्या पैकी प्रदूषण ही सर्वात मोठी समस्या आहे. हवा अर्थात वायु प्रदूषणा  नंतर ध्वनी व जल प्रदूषण देखील मोठी समस्या बनल्या आहे.

     म्हणूनच आज आपण प्रदूषण एक समस्या (pradushan ek samasya Nibandh marathi) या विषयावर मराठी निबंध प्राप्त करणार आहोत. तर चला सुरू करूया.. 

     प्रदूषण हे एक हळू हळू प्रभाव दाखवणारे विष आहे. आणि ते प्रत्येक दिवसागणिक आपल्या जीवनाला नष्ट करीत आहे. प्रदूषण नैसर्गिक वातावरणाला दूषित करून पर्यावरणात अस्थिरता निर्माण करते. प्रदूषणाला मुख्यतः तीन भागात विभाजित केले आहे वायू प्रदूषण, ध्वनि प्रदूषण आणि जल प्रदूषण.

     वायुप्रदूषण हे वाहनांमधून निघणारे इंधनाचे धूर, औद्योगिक कारखाने, उडणारी धूळ इत्यादी कारणांमुळे होते. या दूषित वायू ला श्वासाद्वारे आत घेतल्याने हृदय संबंधी रोग निर्माण होतात.

     निसर्गाला हानी पोहोचवणारे दुसरे प्रदूषण ध्वनिप्रदूषण आहे, हे प्रदूषण वाहनांचे हॉर्न, औद्योगिक कारखान्यातील मशीन चे आवाज, लग्न तसेच इतर समारंभातील डीजे इत्यादी अनेक कारणांमुळे होते. अत्याधिक ध्वनिप्रदूषणामुळे बहिरेपणा आणि काना संबंधी रोग वाढतात.

     जल प्रदूषण ही सुद्धा अतिशय मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली प्रदूषणाची समस्या आहे. नदी व तलावात कारखान्यातून निघणारे टाकाऊ पदार्थ व प्लास्टिक कचरा टाकल्याने जल प्रदूषण होते.

     आज प्रदूषण हे अनेक पद्धतीने होत आहे. या प्रदूषणाच्या समस्येला कमी करण्यासाठी जास्तीत जास्त झाडे लावायला हवीत व लोकांना प्रदूषणाने होणाऱ्या समस्यांविषयी जागृत करायला हवे.

--लेखक-मोहित पाटील
--------------------

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-भाषण मराठी.कॉम)
                   -------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-05.02.2023-रविवार.
=========================================