भग्न हृदयाची कविता-भंगलेल्या स्वप्नांनी मला शिकवलंय, मी भग्न हृदयाचे दुःख जाणलंय

Started by Atul Kaviraje, February 06, 2023, 12:19:25 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला एक, भंगलेलं स्वप्न आणि भग्न हृदयाची कविता-गीत (SAD SONG)  ऐकवितो. "टूटे हुए ख़्वाबों ने, हमको ये सिखाया है, दिल ने जिसे पाया था, आँखों ने गंवाया है"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपली फेब्रुवारी महिन्याची ही सोमवार-मध्यरात्र आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे -(टूटे हुए ख़्वाबों ने, हमको ये सिखाया है, दिल ने जिसे पाया था, आँखों ने गंवाया है)
----------------------------------------------------------------------

             "भंगलेल्या स्वप्नांनी मला शिकवलंय, मी भग्न हृदयाचे दुःख जाणलंय !"
            -----------------------------------------------------------

भंगलेल्या स्वप्नांनी मला शिकवलंय,
मी भग्न हृदयाचे दुःख जाणलंय !
आता कधी प्रेम नको करू, ते म्हणालंय,
प्रेमात फक्त दुःखच असत, त्याने मला समजावलंय !

भंगलेल्या स्वप्नांनी मला शिकवलंय,
मी भग्न हृदयाचे दुःख जाणलंय !
यापुढे प्रेमात नाही पडायचं मी ठरवलंय,
असं सांगून मी माझ्या हृदयाला मनवलंय !

आजवर डोळे ज्याला होते शोधत
आजवर नयन ज्याच्या होते शोधात
ते हाती माझ्या कधीच नाही गवसले,
डोळयात माझ्या फक्त अश्रूच साठत राहिले.

वाटलं होत की कुणी नाराज आहे माझ्यावर
वाटलं की कुणी उदास आहे या जगण्यावर
पण माझे वाटणे हे फुकाचं होते,
कुणाला कोणाचे येथे काय पडले होते.

ज्याचा विचार केला ते कधीही नाही घडलं
ज्याचा नाही केला, तेच ते सामोरी आलं
इच्छांचे कफन ओढून मन माझे,
आपणहूनच मरणाला सामोर गेलंय.

माझा आवाज हुंदक्यांतच दबला गेलाय
केव्हातरी तो उंच गगनी भिडायचा
माझ्या आवाजाचा सूर आज बिघडलाय,
केव्हातरी तो मैफिलीत रंग भरायचा.

आज माझे दोन्ही किनारे सुनसान आहेत
पाणी आहे, पण त्यात जीवनच नाही
आज माझी दुनिया उजाडून गेली आहे,
प्राण आहे, पण निर्जीवच माझी गत झाली आहे.

स्वप्न-भंगाचे दुःख मी नाही सहू शकत
यापुढे स्वप्न नाही पाहायची मी ठरवलंय
मना तू आता नको गुंतू कुणातच,
हृदयाला मी आता समजावूनच सांगितलंय.

भंगलेल्या स्वप्नांनी मला शिकवलंय,
मी भग्न हृदयाचे दुःख जाणलंय !
आता कधी प्रेम नको करू, ते म्हणालंय,
प्रेमात फक्त दुःखच असत, त्याने मला समजावलंय !

भंगलेल्या स्वप्नांनी मला शिकवलंय,
मी भग्न हृदयाचे दुःख जाणलंय !
यापुढे प्रेमात नाही पडायचं मी ठरवलंय,
असं सांगून मी माझ्या हृदयाला मनवलंय !

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-06.02.2023-सोमवार.   
=========================================