राहूनच गेले

Started by तुतेश रिंगे ✍️, February 06, 2023, 04:39:08 AM

Previous topic - Next topic

तुतेश रिंगे ✍️

मी आनंदी आहे
हे दाखविण्याचा नादात
दुःख सांगणे राहूनच गेले

मी तुझ्याविना सुखी आहे
हे सांगण्याच्या नादात
तु कशी आहेस? विचारने राहूनच गेले

तू गेल्यावर एकदातरी पाठीमागे बघशील
ह्या खोट्या आशेच्या नादात
डोळ्यांतील पाणी पुसण्याचे राहूनच गेले
:- तुतेश रिंगे ✍️
__________________________________
Follow me on instagram
shabd_mazya_manatale__