विरह कविता-गीत-जा प्रिये, खुश रहा तू, परकी झालीस तरी माझी आहेस तू !

Started by Atul Kaviraje, February 06, 2023, 12:49:21 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला एक, विरह कविता-गीत ऐकवितो. "खुश रहे तू सदा, ये दुआ है मेरी, बेवफ़ा ही सही, दिलरुबा है मेरी"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपली फेब्रुवारी महिन्याची ही सोमवार-दुपार आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे -(खुश रहे तू सदा, ये दुआ है मेरी, बेवफ़ा ही सही, दिलरुबा है मेरी)
--------------------------------------------------------------------------

                "जा प्रिये, खुश रहा तू, परकी झालीस तरी माझी आहेस तू !"
               ----------------------------------------------------

जा प्रिये, खुश रहा तू,
परकी झालीस तरी माझी आहेस तू !

जा प्रिये, खुश रहा तू,
परकी झालीस तरी माझी आहेस तू !
सदिच्छा जा घेऊन माझ्या तू,
आज दुसऱ्याचे घर सजव तू !

जा प्रिये, खुश रहा तू,
परकी झालीस तरी माझी आहेस तू !
मन नाही मानत, पण खरं आहे हे,
माझं मन तोडून आज चाललीस तू !

तुझ्या बेवफाईला मी काय शिक्षा देऊ
तुझ्या विवाहाला मी काय तोहफा देऊ
आज काहीही नाहीय माझ्या हाती,
भग्न हृदयाचा का मी श्राप देऊ ?

जा तू हो सुखी, तुझ्या नव्या जीवनात तू
जा तू रहा आनंदी, तुझ्या नव्या आयुष्यात तू
बस मी राहीन एकटा, दुःख बाळगीत उरी,
बसेन लाटांचा खेळ पहात सागर किनारी.

तुला संभाळण्यास तुझा नवीन साथी मिळालाय
तुला थIमण्यास त्याचा आपलासा हात मिळालाय
माझं काय, माझी नाव अशीच बुडत राहील,
फुटता फुटता, किनारी येऊन आदळत राहील.

माझी मर्जी कोण संभाळतोय इथे
माझा देवही माझ्यावर रूसलाय जिथे
तोल जातोय माझा, मीच मला सांभाळतोय,
तेच विरहाचे दुःख पुन्हा उरी बाळगतोय.

हा जाचक विरह मला आयुष्यभर छळेल 
तुझा नवीन संसार तुला जीवनभर फळेल ?
तुझा जीव हळूहळू नव्या घरी रुळेल,
माझ्या दुःखांची परिसीमा तुला कशी कळेल ?

ही वेदना आयुष्यभर साथ करील मजला
ही संवेदना जीवनभर टोचत राहील मजला
या दिलाचा काय कळेल तुला दर्द ?
कुणी म्हटलंय, "मर्द को कभी होता नही है दर्द ?"

मरण नाही मागितलंय मी देवाशी
मी आजही आहे तुझ्या प्रेमाचा उपाशी
ते आले तर मी स्विकारीनंही,
जगून तरी काय उपयोग माझा या देही ?

मरण हाच आहे का अंतिम पर्याय
मृत्यू हाच आहे का जालीम दवाय
नाही प्रिये, मी तुझ्याशिवायही जगेन,
पुढील जन्मी देवापाशी तुलाच मागेन.

जा प्रिये, खुश रहा तू,
परकी झालीस तरी माझी आहेस तू !

जा प्रिये, खुश रहा तू,
परकी झालीस तरी माझी आहेस तू !
सदिच्छा जा घेऊन माझ्या तू,
आज दुसऱ्याचे घर सजव तू !

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-06.02.2023-सोमवार.   
=========================================