स्वतःवरली दुःखी कविता-गीत-माझे हाल कुणी विचारीत नाही, आज मला कुणी विचारीत नाही !

Started by Atul Kaviraje, February 06, 2023, 11:12:49 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला एक, स्वतःवरली दुःखी कविता-गीत (SAD-SONG) ऐकवितो. "कभी ख़ुद पे, कभी हालात पे रोना आया"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपली फेब्रुवारी महिन्याची ही सोमवार-रजनी आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे -(कभी ख़ुद पे, कभी हालात पे रोना आया)
----------------------------------------------------

             "माझे हाल कुणी विचारीत नाही, आज मला कुणी विचारीत नाही !"
            ---------------------------------------------------------

माझे हाल कुणी विचारीत नाही,
आज मला कुणी विचारीत नाही !

माझे हाल कुणी विचारीत नाही,
आज मला कुणी विचारीत नाही !
मला स्वतःवरच कधी हसू येत,
मला स्वतःवरच कधी रडूही येत.

माझे हाल कुणी विचारीत नाही,
आज मला कुणी विचारीत नाही !
समाजाला काय झालंय कळत नाही,
लोकांची साधी विचारपूसही नाही.

माझे हाल कुणी विचारीत नाही,
आज मला कुणी विचारीत नाही !
याच गोष्टीच दुःख होऊन राहिलय,
याचाच सल वेदना देऊन राहिलाय.

माझे हाल कुणी विचारीत नाही,
आज मला कुणी विचारीत नाही !
असं वाटतंय माझी पर्वाच कुणाला नाही,
असं वाटतंय माझी काळजी कुणालाच नाही.

वाटलं होत कुणीतरी माझ्यावर प्रेम करतय
वाटलं होत कुणीतरी आपलंस असेल
पण नाही, तो सर्व आभासच होता,
ते माझं वाटण सर्वथः वृथाच होत.

मीही कुणावर प्रेम केलं होतं
पण ते माझ्या मनातच राहील होतं
मी ते कधी विसरेन असं मला वाटत होतं,
पण नाही, ते मला विसरूच देत नव्हतं.

कुणासाठी जगतोय आपण कळत नाही
कशासाठी जगतोय आपण तेही कळत नाही
जीवनाचा काय उद्देश्य माहित नाही,
आयुष्याचा काय मतलब अवगत नाही.

अश्या अनेक प्रश्नांनी भंडIवलय मला
असे कित्येक सवाल भेडसावताहेत मनाला
यांची उत्तरे मला कधीच मिळाली नाहीत,
प्रश्नांची सरबत्ती कधी थांबलीच नाही. 

कोण कुणासाठी अश्रू ढाळतंय माहित नाही
कोण कुणासाठी रडतंय ठाऊक नाही
त्यात आपलेही नसतात, परकेही नसतात,
या गंगा-यमुना का वाहतात कळत नाही.

आज माझ्यासाठी कुणीही रडत नाही
आज माझ्यासाठी कुणीही थांबलेलं नाही
ज्याला त्याला त्याचीच पडलेली आहे,
हे जग कुणासाठीही थांबत नाही.

माझे हाल कुणी विचारीत नाही,
आज मला कुणी विचारीत नाही !

माझे हाल कुणी विचारीत नाही,
आज मला कुणी विचारीत नाही !
मला स्वतःवरच कधी हसू येत,
मला स्वतःवरच कधी रडूही येत

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-06.02.2023-सोमवार.   
=========================================