आठवणींवरली कविता-गीत-दिवस येतो, रात्रही निघून जाते, तुझी फक्त आठवण देऊन जाते !

Started by Atul Kaviraje, February 07, 2023, 06:00:12 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला एक, आठवणींवरली कविता-गीत ऐकवितो. "सुबह ना आई, शाम ना आई, जिस दिन तेरी याद ना आई"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपली फेब्रुवारी महिन्याची ही सांज-मंगळवार आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे -(सुबह ना आई, शाम ना आई, जिस दिन तेरी याद ना आई)
-------------------------------------------------------------------

             "दिवस येतो, रात्रही निघून जाते, तुझी फक्त आठवण देऊन जाते !"
            ----------------------------------------------------------

दिवस येतो, रात्रही निघून जाते,
तुझी फक्त आठवण देऊन जाते !

दिवस येतो, रात्रही निघून जाते,
तुझी फक्त आठवण देऊन जाते !
वर्षानुवर्षे अशीच जात राहतात,
आठवणी हळूहळू भूतकाळात जमा होतात.

दिवस येतो, रात्रही निघून जाते,
तुझी फक्त आठवण देऊन जाते !
माणूस नसतो, फक्त आठवणीच उरतात,
दुःखाचाच सल त्या देऊन जातात.

आनंद शोधणाऱ्याला धन प्राप्त झाले
हास्य शोधणाऱ्याला बाग-बहार मिळाली
प्रेम शोधणाऱ्याला काहीच नाही गवसले,
उलट तना-मनाची त्याने सुधबुध हरवली.

आज तीही नावालाच उरली
आज तीही आठवणीतच राहिली
दिवस रात्रीच्या या निरंतर चक्रात,
येता येता तिची आठवण झाली.

हा असला कसला तुझा लगाव
विसरता जो विसरता येत नाही
हसणंही मी गेलो विसरून,
आनंदही माझा गेला हरपून.

अश्रूंचाही माझ्या मोल ठरला
अर्थीच्या कफनाचाही लिलाव झाला
साऱ्या जगाशी मी वैर पत्करले,
फक्त तुझ्यासाठी मी हे केले.

तुझी मला आजही उम्मीद आहे
तुझ्या परतण्याची खोटी आस आहे
तू मिळताच माझी कथा पूर्ण होईल,
तू नसता माझे जीवन अपूर्ण राहील.

आजही माझे ताजमहालाचे स्वप्न आहे
आजही माझे एका घराचे स्वप्न आहे
फक्त तुझीच त्यात कमी आहे,
तूच माझी मुमताज बेगम आहेस.

पण ते स्वप्न अंती स्वप्नच राहिले
डोळ्यांत निरंतर आसवांना तोलत राहिले
फक्त श्वासांपुरताच आहे मी जिवंत,
धडधड होतेय मंद मंद, अति संथ.

कोठेही असशील फक्त येऊन जा
कशीही असशील झलक देऊन जा
तनाला आणि मनाला जाळणारी,
ही वेदना कायमची घेऊन जा.

नयनांत असेना का सुख-दुःखाचे पाणी
तुझ्या येण्याकडे डोळे लावून बसलोय
माझी बिछायत असेना का काट्यांची,
वाटेवर फुलांची पायघडी पसरून राहिलोय.

दामन आणि कफन यात काय अंतर उरलंय ?
दोघांची तार तर एकचं आहे
आता तुला करायचीय निवड दोघांमध्ये,
अन्यथा, मृत्यूचं अंतिम पर्याय आहे.

दिवस येईल, संध्याकाळ होईल, रात्रही जाईल
तुझी आठवणच मला सहारा देईल
आजही ते क्रमाक्रमाने येतात, जातात,
जाताना फक्त तुझ्या आठवणीच देऊन जातात.

दिवस येतो, रात्रही निघून जाते,
तुझी फक्त आठवण देऊन जाते !

दिवस येतो, रात्रही निघून जाते,
तुझी फक्त आठवण देऊन जाते !
वर्षानुवर्षे अशीच जात राहतात,
आठवणी हळूहळू भूतकाळात जमा होतात.

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-07.02.2023-मंगळवार.
=========================================