स्वप्नं

Started by mkapale, February 07, 2023, 10:02:34 PM

Previous topic - Next topic

mkapale

एका श्वासानंतर जसं दुसरा घेत जगणं
आयुष्य एकामागे एक स्वप्नांची माळ असतं
इच्छा स्वप्नं..स्वप्न इच्छा ह्या जुगलबंदीत
दिवास्वप्न आणि रातस्वप्न ह्यांचं मिलन कधी होत असतं

भरारी रोज उंच घेतली की आकाश अजून मोठं होतं
विमान कोणा उडवायचं तर कोणा त्यात बसायचं असतं
एकमेकांच्या स्वनांतूनच सगळे आपापला प्रवास करतात
अमावस्या असो की पौर्णिमा स्वनांचं चांदणं सदैव असतं

ती ना लहान ना मोठी, सगळी अनमोलच असतात
त्यांच्या मागे नेहेमीच कसून धावायचं असतं
पोटभरल्यानंतरही भूक लागते वेळानी काही
स्वतःची असो का इतरांची..भांडार त्यांचं अमाप असतं

आयुष्याचे पुस्तक जणू स्वप्नांच्या पानांची गठडी
किती पानांचं ते असावं ते प्रत्येकानी ठरवायचं असतं
स्वप्नातून इच्छा , इच्छेतून मार्ग , मार्गांचे मग फाटे
मागे वळून कधी,  किती चाललो ते हसून पाहायचं असतं