आयुष्याच्या कहाणीवर कविता-गीत-आज तू केवळ कहाणी आहेस, हीच तुझी दुःखद विराणी आहे !

Started by Atul Kaviraje, February 07, 2023, 11:53:55 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला एक, आयुष्याच्या कहाणीवर कविता-गीत (SAD SONG) ऐकवितो. "न तू ज़मीन के लिए है, न आसमान के लिए, तेरा वजूद है अब दास्ताँ के लिए"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपली फेब्रुवारी महिन्याची ही निशा-मंगळवार आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे -(न तू ज़मीन के लिए है, न आसमान के लिए, तेरा वजूद है अब दास्ताँ के लिए)
----------------------------------------------------------------------

              "आज तू केवळ कहाणी आहेस, हीच तुझी दुःखद विराणी आहे !"
             --------------------------------------------------------

आज तू केवळ कहाणी आहेस,
हीच तुझी दुःखद विराणी आहे !

आज तू केवळ कहाणी आहेस,
हीच तुझी दुःखद विराणी आहे !
तुझा कोणालाही उपयोग नव्हता तेव्हा,
आजही तू केवळ उपेक्षाच आहेस.

आज तू केवळ कहाणी आहेस,
हीच तुझी दुःखद विराणी आहे !
आयुष्याने तुला खूप दुःख दिले,
ते सारे तू उद्वेगाने सहन केले.

आज तू कुणासाठीही नाहीस
तुझ्या असण्याचे काहीच कारण नाही
जमान्याकडून दुर्लक्षिलेला आहेस तू,
लोकांकडून उपेक्षितच आहेस तू.

तुझ्याकडून कुणाची काहीही अपेक्षा नाही
तुझ्याकडून कुणाला काहीही नकोय
तुझे असणे काय अन नसणे काय,
कुणालाच काही फरक पडत नाही.

परत फिरून काहीही होणार नाही
ती बाग पुन्हा बहरून येणार नाही
ज्या फांदीवर घरटे होते पक्ष्यांचे,
ती फांदी आज अस्तित्त्वातच नाही.

परतून काही फायदाच नाही
जमीनदोस्त झाले होते ते घर केव्हाच
डागडुजी करून काय होणार आहे,
घराचे वासे तुटले आहेत केव्हाच.

या मतलबी दुनियेत तुझे नाही कुणीही
या खुदगर्ज जमान्यात तुला ओळखणारे नाही कुणीही
वफाईच्या शोधात तू नकोस पडू येथे,
बेवफाईचं पडेल नजरेस तुला जिथे तिथे.

कुणाच्या भानगडीत तू पडूच नकोस
कुणाच्या नजरेसही तू पडू नकोस
अलिप्त राहा, दुःखाचे गाणे गात राहा,
कारण तीच तुझी नियती आहे, नशीब आहे.

हे जग तुझ्यासाठी नव्हतंच तेव्हा
ही धरती, हे गगन तुझ्यासाठी नाहीच केव्हा
बस तू एक कहाणीपुरताच होतास,
आताही तू फक्त कहाणीपुरताच आहेस.

आज तू केवळ कहाणी आहेस,
हीच तुझी दुःखद विराणी आहे !

आज तू केवळ कहाणी आहेस,
हीच तुझी दुःखद विराणी आहे !
तुझा कोणालाही उपयोग नव्हता तेव्हा,
आजही तू केवळ उपेक्षाच आहेस.

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-07.02.2023-मंगळवार.
=========================================