हरवलेल्याप्रेमावरकविता-अंधारात प्रकाशच लुप्त झालाय, प्रेमाचा तारा काळोखात हरवलाय

Started by Atul Kaviraje, February 08, 2023, 03:53:59 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला एक, हरवलेल्या प्रेमावर कविता-गीत ऐकवितो. "रहा गर्दिशों में हरदम मेरे इश्क़ का सितारा, कभी डगमगायी कश्ती, कभी लुट गया किनारा"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपली फेब्रुवारी महिन्याची ही बुधवार-दुपार आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे -(रहा गर्दिशों में हरदम मेरे इश्क़ का सितारा, कभी डगमगायी कश्ती, कभी लुट गया किनारा)
---------------------------------------------------------------------

            "अंधारात प्रकाशच लुप्त झालाय, प्रेमाचा तारा काळोखात हरवलाय !"
           ------------------------------------------------------------

अंधारात प्रकाशच लुप्त झालाय,
प्रेमाचा तारा काळोखात हरवलाय !

अंधारात प्रकाशच लुप्त झालाय,
प्रेमाचा तारा काळोखात हरवलाय !
गगनाला आ-क्षितिज गवसणी घालायचा,
त्याचा प्रकाश आज मंदावत चाललाय !

अंधारात प्रकाशच लुप्त झालाय,
प्रेमाचा तारा काळोखात हरवलाय !
आकाशही आज भासू लागलंय फिके,
चमकेस लुप्त करू लागलंय धुके. 

प्रेम सागराला येत होती भरती तेव्हा
आज तो वादळात घेरला गेलाय
त्या तुफानाने माझी नावही बुडवलीय,
उसळत्या लाटांनी माझा किनाराही लुटलाय.

कुणीतरी आज माझ्याबरोबर खेळ खेळतंय
प्रेम करणं त्यांना खेळच वाटतोय
माझा प्रेमाची जणू त्यांनी बाजीच लावलीय,
प्रेम म्हणजे त्यांना जुगारच वाटतोय.

या खेळात पावलापावलावर त्याची जीत आहे
आणि माझी प्रत्येक बाजी मी हरत आहे
माझ्या प्रेमात मी लुटलाच गेलोय,
लुटण्यासाठीच मी खेळवला गेलोय.

मीच ठरलोय अंती कमनशिबी
हीच होती का नियती माझ्या नशिबी
जी होती प्राणांपेक्षाही प्रिय मला,
वेदना देऊन गेली ती माझ्या मनाला.

दुःखाचा डोंगर जेव्हा कोसळतो
तेव्हा भल्याभल्यांचा धीर खचतोय
प्रेमात ठरलोय मी असाच असफल,
मनाचा जणू माझ्या कडेलोटच होतोय.

प्रेमाने मला खूप वेदना दिल्यात
वाटतंय आता मरणच यावं
जिवंतपणीच मरण यातना सहल्यात मी,
इतकं कि मरणही सुसह्य व्हावं.

प्रेमाचा तारा मंदावत चाललाय
अंधाऱ्या गर्भात मिसळत चाललाय
प्रेमाचा तारा कायमचाच लुप्त झालाय,
पुसटसा प्रकाश फक्त पाठी राहिलाय.

अंधारात प्रकाशच लुप्त झालाय,
प्रेमाचा तारा काळोखात हरवलाय !

अंधारात प्रकाशच लुप्त झालाय,
प्रेमाचा तारा काळोखात हरवलाय !
गगनाला आ-क्षितिज गवसणी घालायचा,
त्याचा प्रकाश आज मंदावत चाललाय !

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-08.02.2023-बुधवार.
=========================================