मला आवडलेला निबंध-निबंध क्रमांक-120-शेतकरी

Started by Atul Kaviraje, February 10, 2023, 10:37:03 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                "मला आवडलेला निबंध"
                                   निबंध क्रमांक-120
                               ----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला निबंध", या निबंध-मालिकेतील एक महत्त्वाचा निबंध. या निबंधाचे शीर्षक आहे- "शेतकरी"

     मित्रानो आपल्या देशात वेगवेगळ्या लोकांद्वारे वेगवेगळे व्यवसाय केले जातात. पण आजच्या या निबंधाचा विषय आहे शेतकरी निबंध मराठी. शेतकरी हा अन्नदाता म्हणून ओळखला जातो. आज आपण याच अन्नदात्याबद्दल Farmer essay in marathi प्राप्त करणार आहोत तर चला सुरू करुया.

     भारतीय संस्कृती ही विविधतेने नटलेली आहे. भारतात जवळपास 22 प्रमुख भाषा व 720 बोल्या बोलल्या जातात. भारतात अनेक तऱ्हेचे व्यवसाय केले जातात. पण शेती हा भारतातील प्रमुख व्यवसाय आहे. म्हणूनच भारताला 'कृषी प्रधान देश' म्हणून सुद्धा ओळखले जाते. शेतकरी भारताचा कणा आहेत. भारतीय अर्थव्यवस्थेत त्याचे 17% योगदान आहे.  शेतकऱ्यांमुळेच भारत आज अन्नाच्या बाबतीत आत्मनिर्भर आहे. या शिवाय दर वर्षी खूप सारे खाद्यान्न भारतातून इतर देशांना निर्यात केले जाते.

     भारतीय शेतकऱ्याचे अर्थव्यवस्थेत येवढे मोठे योगदान असताना देखील त्याची अवस्था आज दयनीय आहे. शेतकरी आज आत्महत्या करीत आहेत. काही शेतकरी शेती सोडून इतर व्यवसाय पाहत आहेत. खेड्यातून रोजगाराच्या शोधात शहरी भागात येत आहेत. शेतकरी व त्यांच्या कुटुंबाला दोन वेळेचे जेवण मिळणे सुद्धा कठीण झाले आहे.

     शेतकऱ्यांच्या या सर्व समस्यांकडे सरकारने लवकरात लवकर लक्ष द्यायला हवे. शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे प्रशिक्षण द्यायला हवे. शासनाने त्यांच्या धान्याला योग्य भाव मिळवून द्यायला हवा. नाहीतर तो दिवस दूर नाही जेव्हा आपण खाद्य निर्यात देशापासून एक खाद्य आयातक देश बनून जाऊ.

--लेखक-मोहित पाटील
--------------------

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-भाषण मराठी.कॉम)
                   -------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-10.02.2023-शुक्रवार.
=========================================