प्रेमातील पश्चIतापIची कविता-तुझा अपराधी आहे मी प्रिये,तुला दुःखच दिलंय मी प्रिये

Started by Atul Kaviraje, February 11, 2023, 12:41:44 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला एक, प्रेमातील पश्चIतापIची कविता-गीत ऐकवितो. "गम उठाने के लिए मई तो जिए जाउँगा, सांस की लय पे तेरा नाम लिए जाऊंगा"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपली फेब्रुवारी महिन्याची ही शनिवार-मध्यरात्र आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे-(गम उठाने के लिए मई तो जिए जाउँगा, सांस की लय पे तेरा नाम लिए जाऊंगा)
------------------------------------------------------------------------

                   "तुझा अपराधी आहे मी प्रिये, तुला दुःखच दिलंय मी प्रिये !"
                  ----------------------------------------------------

तुझा अपराधी आहे मी प्रिये,
तुला दुःखच दिलंय मी प्रिये !

तुझा अपराधी आहे मी प्रिये,
तुला दुःखच दिलंय मी प्रिये !
तुला नाही समजू शकलो मी,
तुझे प्रेम मला नाही कळलं प्रिये !

तुझा अपराधी आहे मी प्रिये,
तुला दुःखच दिलंय मी प्रिये !
तू मला इतकं प्रेम दिलंस,
त्याबद्दल मी तुला काय दिलंय प्रिये ?

माझ्या वर्तनाने सारं जग शहारतय
माझ्या वागणुकीने सारं आकाश थरारतंय
असा कसा वागलो मी तुझ्याशी,
तुला मी दुःख का दिलंय प्रिये !

ईश्वरही मला माफ नाही करणार
जोवर मला पश्चIताप नाही होणार
मला स्वर्ग काय नरकही नाही मिळणार,
जोवर मी तुझी माफी नाही मागणार.

समाज आज मला वाळीत टाकतोय
समाज आज मला मुद्दामूनच टाळतोय
असे कसे घडले माझ्या हातून,
तुझा गुन्हेगारच आहे मी प्रिये !

हे ईश्वरा तू मला अशी सजा दे
माझ्या गुन्ह्याला तू अशी शिक्षा दे
आयुष्यभर मी सजा भोगत राहीन,
जीवनभर मी असाच बेचैन राहीन.

सर्वजण असतील, मजेत जगतील
सारेजण हसतील, मजेत राहतील
माझे प्राक्तन ठरव, शेवटपर्यंत दु:खी राहीन मी,
नव्हे, याच तर लायकीचा आहे मी.

या दु:खातच मी जगत राहीन
या वेदना मी स्वतःला देत राहीन
हीच मला शिक्षा आहे माझ्या कर्माची,
हीच योग्य सजा आहे माझी, प्रिये !

शेवटपर्यंत ओठावर तुझंच नाव असेल
शेवटपर्यंत हृदयात तूच असशील
जोपर्यंत माझा श्वास सुरु असेल,
प्रत्येक श्वासात तुझाच ध्यास असेल, प्रिये !

तू मला आजवर फक्त प्रेमचं दिलंस
तुझा स्नेह, तुझी चIहत, खूप काही दिलंस
माझ्यावर निस्सीम, अतोनात प्रेम तू केलंस,
प्रेमाचंI अर्थ काय, मला तू समजIवलस.

पण माझं वागणं असं का होतं, प्रिये
मी असं का वागतं होतो, तुझ्याशी
तुला नफरतच करत होतो, मी तेव्हा,
तुझा तिरस्कारच करत होतो, मी तेव्हा.

हे माझ्या प्रेमदेवते, माझ्या सखे
माझ्या वर्तनाची मला आज लाजच वाटतेय
मी तुझा अपराधीच आहे, प्रिये,
आजही तो तू कंटकाचा मार्ग चालतेयस.

आजही तू माझ्या मनात आहेस
आजही तू माझ्या विचारात आहेस
आजही तू माझ्या सोबतच आहेस,
आजही तू माझ्या श्वासातच आहेस.

इतकं तू माझ्यावर प्रेम करत होतीस
इतकी तू मला चIहत होतीस
पण मी तुझ्याकडे दुर्लक्ष करून,
दुसऱ्यांचाच आधार घेत होतो.

मला आज माझीच लाज वाटतेय
तुला पुन्हा तोंड कसं दाखवू ?
मला आज माझाच राग येतोय,
पुन्हा तुझं प्रेम कसं जिंकू ?

माझ्या कृतकर्माचे फळ मला मिळालंय
मला माझ्या पापाचे प्रायश्चित्त भोगायचंय
मला आयुष्यभर या आगीत जळायचंय,
मला जीवनभर या वेदनेतच जगायचंय.

तुझा अपराधी आहे मी प्रिये,
तुला दुःखच दिलंय मी प्रिये !

तुझा अपराधी आहे मी प्रिये,
तुला दुःखच दिलंय मी प्रिये !
तुला नाही समजू शकलो मी,
तुझे प्रेम मला नाही कळलं प्रिये !

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-11.02.2023-शनिवार.
=========================================