११-फेब्रुवारी-दिनविशेष

Started by Atul Kaviraje, February 11, 2023, 10:22:48 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-११.०२.२०२३-शनिवार. जाणून घेऊया,आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"

                                  "११-फेब्रुवारी-दिनविशेष"
                                 ----------------------

-: दिनविशेष :-
११ फेब्रुवारी
=========================================
अ) महत्त्वाच्या घटना:
   ----------------
२०११
१८ दिवसांच्या जनआंदोलनानंतर होस्‍नी मुबारक यांना इजिप्तची सत्ता सोडणे भाग पडले.
१९९९
मध्यप्रदेश सरकारतर्फे दिला जाणारा लता मंगेशकर पुरस्कार प्रसिद्ध संगीतकार इलियाराजा यांना जाहीर.
१९९०
२७ वर्षांच्या तुरुंगवासानंतर नेल्सन मंडेला यांची तुरूंगातुन सुटका
१९७९
पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी अंदमान निकोबार बेटावरील सेल्युलर जेल राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले.
१९२९
पोप पायस (११ वा) आणि बेनिटो मुसोलिनी यांच्यात झलेल्या 'लॅटेरान ट्रिटी' या विशेष करारानुसार 'व्हॅटिकन सिटी' हे शहर राष्ट्र इटालीतुन वेगळे करण्यात आले. कॅथॉलिक ख्रिश्चनांचे हे प्रमुख धर्मपीठ आहे.
१९११
हेन्र्‍री पिके याने हंटर जातीच्या विमानातून भारतातील पहिली 'एअर मेल' अलाहाबादवरुन नैनी या १० किलोमीटर अंतरावरील गावाला वाहून नेली.
१८३०
मुंबईचे हंगामी राज्यपाल सर सिडने ब्रेकनिथ यांच्या अध्यक्षतेखाली सभा होऊन ऍग्री हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना झाली.
१८१८
इंग्रजांनी अजिंक्यतारा किल्ला ताब्यात घेतला.
१७५२
पेनसिल्व्हानिया हॉस्पिटल या अमेरिकेतील पहिल्या हॉस्पिटलचे बेंजामिन फ्रँकलिनच्या हस्ते उद्‌घाटन झाले.
१६६०
औरंगजेबाने मुख्तारखान याला दख्खनेची जबाबदारी देऊन औरंगाबाद येथे पाठवले.
=========================================
ब) जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  -----------------------------
१९४२
गौरी देशपांडे – कादंबरीकार, लघुकथालेखिका आणि कवयित्री
(मृत्यू: १ मार्च २००३)
१९३७
बिल लॉरी – ऑस्ट्रेलियन क्रिकेटर
१८४७
थॉमस अल्वा एडिसन
थॉमस अल्वा एडिसन – अमेरिकन संशोधक आणि उद्योजक
(मृत्यू: १८ आक्टोबर १९३१)
१८३९
अल्मोन स्ट्राउजर – अमेरिकन संशोधक [टेलिफोन एक्सचेंज]
(मृत्यू: २६ मे १९०२)
१८००
हेन्‍री फॉक्स टॅलबॉट – छायाचित्रणकलेचा पाया घालणारे शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ
(मृत्यू: १७ सप्टेंबर १८७७)
=========================================
क) मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
    -------------------------
१९९३
सईद अमीर हैदर कमाल नक्‍वी ऊर्फ 'कमाल अमरोही' – चित्रपट निर्माता, दिग्दर्शक, संवादलेखक, पटकथाकार व कवी
(जन्म: १७ जानेवारी १९१८)
१९७७
फक्रुद्दीन अली अहमद – भारताचे ५ वे राष्ट्रपती. १९७४ च्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत इंदिरा गांधींच्या नेतृत्त्वाखालील काँग्रेसतर्फे ते निवडून आले. २५ जून १९७५ रोजी आणीबाणीची घोषणा त्यांच्याच कारकिर्दीत करण्यात आली.
(जन्म: १३ मे १९०५)
१९६८
पण्डित दीनदयाळ उपाध्याय – तत्त्वज्ञ, अर्थतज्ञ, समाजशास्त्री, इतिहासकार, पत्रकार, राजकीय नेते आणि जनसंघाचे एक संस्थापक यांची अज्ञात मारेकर्‍याकडुन हत्या
(जन्म: २५ सप्टेंबर १९१६)
१९४२
जमनालाल बजाज – प्रसिद्ध गांधीवादी कार्यकर्ते, स्वातंत्र्यसैनिक आणि बजाज उद्योगसमुहाचे प्रणेते
(जन्म: ४ नोव्हेंबर १८८४)
१६५०
रेने देकार्त – फ्रेन्च तत्त्वज्ञ व गणितज्ञ
(जन्म: ३१ मार्च १५९६)
=========================================

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-11.02.2023-शनिवार.
=========================================