सुख-दुःखाची प्रेम कविता-गीत-तुझं दुःख मी घेतलंय, तुझ्या वेदनांना मी जपलंय !

Started by Atul Kaviraje, February 12, 2023, 06:17:31 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला एक, सुख-दुःखाची प्रेम कविता-गीत ऐकवितो. "मेरे यारा तेरे ग़म अगर पायेगें, हमे तेरी है कसम हम संवर जायेगें"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपली फेब्रुवारी महिन्याची ही रविवार-संध्याकाळ आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे-(मेरे यारा तेरे ग़म अगर पायेगें, हमे तेरी है कसम हम संवर जायेगें)
------------------------------------------------------------------------

                      "तुझं दुःख मी घेतलंय, तुझ्या वेदनांना मी जपलंय !" 
                     ---------------------------------------------

तुझं दुःख मी घेतलंय,
तुझ्या वेदनांना मी जपलंय ! 

तुझं दुःख मी घेतलंय,
तुझ्या वेदनांना मी जपलंय ! 
नाही पाहू शकत मी तुला दुःखात,
तुझं दुःख आता माझं झालंय !

स्वतःला बुडवू नकोस तू दुःखात
अश्रू नकोत आता तुझ्या डोळ्यात
तुझे अश्रू आता माझे झालेत,
तुझ्या वेदना आता माझ्या झाल्यात.

तुला माझ्या प्रेमाची शपथ
तुला दुःखात असलेलं पाहवत नाही
तुला माझ्या प्रीतीचा शब्द,
तुला दुःखात पाहून मला रहावत नाही.

माझी प्रत्येक ख़ुशी मी तुला देईन
माझे सारे सुख मी तुला अर्पीन
दुःखी होऊ नकोस कधीच, प्रिये,
तुला सुखी ठेवण्यासाठी मी काहीही करीन.

ते आपले अल्लड बालवय आठव
प्रेम न कळणारे आपले पोरवय आठव
कळत न कळत वाहिलेल्या शपथा,
मी हरवल्यावर तू रडली होतीस कितींदा.

तारुण्याच्या उंबरठयावर आहोत आपण
तेव्हाचे तू दुःख अजुनी आहे तुझ्यासवे
आजही का ते तू बाळगून ठेवलेस ?
वाटले का नाहीस, ते तू माझ्यासवे ?

बस, तुझं दर्द मला दे, प्रिये
माझी एवढीच आहे विनंती
तुझं सारं दुःख मला दे, प्रिये,
नाहीतर माझ्या मनाला लाभेल अशांती.

तुझं दुःख हेच माझं सुख होईल
तुला दुःखात ठेवून मी कसा सुखी होईन ?
तुझ्या गालांवर मला हसू पाहायचंय,
तुझ्या चेहऱ्यावर मला हसू द्यायचंय.

     प्रिया, दुःखात तू माझा होऊन आलास
     प्रिया, माझ्या या वेदना तू प्यालास
     तूच माझा प्रियकर होऊन आलास,
     माझ्या विराण आयुष्यात सागर होऊन आलास.

     आता मन तुलाच पाहतंय स्वप्नांत
     आता मन तुलाच शोधतंय प्रत्यक्षात
     तूच माझा मसीहा आहेस, ईश्वर आहेस,
     तूच माझा देव आहेस, परमेश्वर आहेस.

     आता काहीही होवो, तू माझाच आहेस
     दुःखात आणि सुखात तूच माझा भागीदार आहेस
     तुला ओळखायला मला उशिरच झाला,
     माझ्या जीवनातला तू माझा साथीदार आहेस.

     दुःखात आणि सुखात तूच माझा भागीदार आहेस,
     माझ्या जीवनातला तू माझा साथीदार आहेस.

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-12.02.2023-रविवार.
=========================================