फसलेल्या प्रेमाची कविता-वेड्या मना पाठी धावू नकोस,या भ्रामक प्रेमास तू भुलू नकोस

Started by Atul Kaviraje, February 13, 2023, 01:12:01 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला एक, फसलेल्या प्रेमाची दुःखद कविता-गीत ऐकवितो. "वो पिया आये ना हो..ओ.. वो पिया आये ना"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपली फेब्रुवारी महिन्याची ही    सोमवार-मध्यरात्र आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे-(वो पिया आये ना हो..ओ.. वो पिया आये ना)
------------------------------------------------------

              "वेड्या मना पाठी धावू नकोस, या भ्रामक प्रेमास तू भुलू नकोस !"
             ---------------------------------------------------------

वेड्या मना पाठी धावू नकोस,
या भ्रामक प्रेमास तू भुलू नकोस !

वेड्या मना पाठी धावू नकोस,
या भ्रामक प्रेमास तू भुलू नकोस !
कितींदा समजवले तुला, कितींदा विनवले,
तरी तू आंधळेपणानेच प्रेम केलेस !

वेड्या मना पाठी धावू नकोस,
या भ्रामक प्रेमास तू भुलू नकोस !
कितींदा सांगितले तुला, कितींदा मनवले,
या प्रेमात तू स्वतःलाच फसवून घेतलेस !

तुला वाटलं त्याचा तुझ्यावर जीव आहे
तुला वाटलं त्याने तुला मन दिलंय
पण हे सर्व खोटेच होते, मना,
त्याचे वादेही सर्व खोटेच होते.

तो कधीच येणार नव्हता
त्याने खोट्याच शपथा घेतल्या होत्या
इतका का तू भरवसा ठेवलास ?
इतका का तू त्याच्यात गुंतलास ?

दोष तुझ्यातच होता, मना
तू त्याला नीट नाही ओळखलंस
चूक तुझीच होती, मना,
त्याला तू नीट नाही पारखलंस.

तू ती स्वप्ने पाहणे आता सोडून दे
त्या वृथा स्वप्नांचा मार्ग अवलंबू नकोस
ती स्वप्ने तू स्वतःच खोडुन टाक,
त्या स्वप्नांचा बांध तू मोडून टाक.

चुकीला कधीच माफी नसते
चुकीची हीच सजI असते
आणि हीच चूक तू केलीस, मना,
प्रेमात पडण्याची भूल तू केलीस.

तुझे नशीब आता दुःखानेच भरलं आहे
तुझ्या नशिबात पुढे दुःखच दुःख आहे
तुझं नशीब तूच ठरवीत होतास,
त्याच्यावर फुका विश्वास ठेवीत होतास.

अश्रुरूपे तू दुःखे ढाळीत आहेस
अश्रूंवाटे तू पच्छाताप करीत आहेस
तुझ्या अश्रूंना थाराच नाही आज,
तुझ्या अश्रूंचा सहाराचं नाही आज.

तुला वाटत तसं ते नव्हतंच मुळी
तुझा तो आभासाचं होता खुळ्या
नाहक तू त्यात ओढला  गेलास,
स्वतःला तू त्यात गुंतवत राहिलास.

अश्याच एका वळणावर थांबले होते जीवन
पुढचा मार्गच खुंटून गेला होता
ज्यासाठी केला होतास तू अट्टाहास आजवर,
तो रस्ता बदलून केव्हाच निघून गेला होता.

हळू हळू तू ते दुःख विसरत जा
काळच हे तुझ्या दुःखावरचे औषध आहे
तो तेव्हा विसरून गेला होता तुला,
आता तुलाही त्याला विसरायचं आहे.

आता तुझा तू वेगळा मार्ग स्वीकार
हळू हळू आता तू स्वतःलाच सांभाळ
झाले गेले सारे सारे विसरून जा,
तुझ्या भावनांचा तू आता कर प्रतिपाळ.

पुन्हा प्रेमात पडण्याची चूक करू नकोस
तो नाही येणार, पुन्हा पाठी वळून पाहू नकोस
त्याचे प्रेमच फसवे होते, खोटे होते,
त्याची वाट पुन्हा तू कधीही पाहू नकोस.

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-13.02.2023-सोमवार.
=========================================