१३-फेब्रुवारी-दिनविशेष

Started by Atul Kaviraje, February 13, 2023, 10:15:28 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१३.०२.२०२३-सोमवार.जाणून घेऊया,आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"

                                  "१३-फेब्रुवारी-दिनविशेष"
                                 -----------------------

-: दिनविशेष :-
१३ फेब्रुवारी
जागतिक रेडिओ दिन
=========================================
अ) महत्त्वाच्या घटना:
   ----------------
२०१०
पुण्यातील जर्मन बेकरी येथे दहशतवाद्यांनी केलेल्या बॉम्बस्फोटात १७ ठार, ६० जखमी
२००३
चित्रपट निर्माते, दिग्दर्शक यश चोप्रा यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान
१९८४
युरी आन्द्रेपॉव्ह यांच्यानंतर कॉन्स्टान्टीन चेरेनेन्को सोविएत संघाचे अध्यक्ष झाले.
१७३९
कर्नालची लढाई – पर्शियाच्या नादिरशहाने मुघलांच्या मुहम्मदशहावर तीन तासांत विजय मिळवला. या विजयामुळे नादिरशहाचा दिल्लीत येण्याचा मार्ग सुकर झाला.
१६६८
स्पेनने पोर्तुगालच्या स्वातंत्र्याला मान्यता दिली.
१६३०
दक्षिणेतील आदिलशाही आणि निजामशाही संपवण्याच्या उद्देशाने मुघल बादशहा शहाजहान मध्य प्रदेशातील बुर्‍हाणपूर येथे पोहोचला.
=========================================
ब) जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  -----------------------------
१९४५
विनोद मेहरा – अभिनेता
(मृत्यू: ३० आक्टोबर १९९०)
१९११
फैज अहमद फैज – लेनिन शांतता पुरस्कार विजेते ऊर्दू शायर
(मृत्यू: २० नोव्हेंबर १९८४)
१९१०
दत्तात्रयशास्त्री धुंडिराज तथा 'दत्तमहाराज' कवीश्वर – वेदविद्येचे आणि संस्कृतचे गाढे अभ्यासक, वेदांती पंडित
(मृत्यू: १ मार्च १९९९)
१८९४
वासुदेव सीताराम तथा वा. सी. बेन्द्रे – इतिहासकार
(मृत्यू: १६ जुलै १९८६)
१८७९
सरोजिनी नायडू – प्रभावी वक्त्या, कवयित्री व स्वातंत्र्यसेनानी, रौलेट कायदा, मॉन्टेग्यू - चेम्सफर्ड सुधारणा, खिलाफत चळवळ, साबरमती करार, असहकार आंदोलन यांत त्यांचा सक्रिय सहभाग होता.
(मृत्यू: २ मार्च १९४९)
१८७६
देबुजी झिंगराजी जानोरकर ऊर्फ 'संत गाडगे महाराज' – कमालीचे अज्ञान, अनिष्ट चालीरीती व अंधश्रद्धा पाहून त्यांनी निरपेक्ष सेवेचे व्रत घेतले आणि त्यासाठी कीर्तनाचे माध्यम प्रभावीपणे वापरले.
(मृत्यू: २० डिसेंबर १९५६)
१८३५
मिर्झा गुलाम अहमद – अहमदिया पंथाचे संस्थापक
(मृत्यू: २६ मे १९०८)
१७६६
थॉमस माल्थस – प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ
(मृत्यू: २३ डिसेंबर १८३४)
=========================================
क) मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
    -------------------------
२०१२
अखलाक मुहम्मद खान उर्फ कवी शहरयार – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ऊर्दू कवी
(जन्म: १६ जून १९३६)
२००८
राजेन्द्र नाथ – हिन्दी व पंजाबी चित्रपटांतील विनोदी अभिनेते
(जन्म: ८ जून १९३१)
१९७४
'सूर रंग' उस्ताद अमीर खॉं – इंदौर घराण्याचे संस्थापक व गायक
(जन्म: १५ ऑगस्ट १९१२)
१९६८
गोपाळकृष्ण भोबे – संगीत समीक्षक, गीतकार व कथालेखक
(जन्म: ? ? ????)
१९०१
लक्ष्मण बापूजी ऊर्फ 'भाऊराव' कोल्हटकर – गायक नट
(जन्म: ९ मार्च १८६३)
१८८३
रिचर्ड वॅग्‍नर – जर्मन संगीतकार, संगीतसंयोजक व दिग्दर्शक
(जन्म: २२ मे १८१३)
=========================================

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-13.02.2023-सोमवार. 
=========================================