विसरलेल्या प्रेमाची कविता-मला विसरून जा कायमचं, एकमेकांशिवाय यापुढे आपण रहायच !

Started by Atul Kaviraje, February 13, 2023, 11:12:18 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला एक, विसरलेल्या प्रेमाची दुःखद कविता-गीत ऐकवितो. "भुला देना मुझे, है अलविदा तुझे"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपली फेब्रुवारी महिन्याची ही    सोमवार-रात्र आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे-(भुला देना मुझे, है अलविदा तुझे)
--------------------------------------------

            "मला विसरून जा कायमचं, एकमेकांशिवाय यापुढे आपण रहायच !"
           ------------------------------------------------------------

मला विसरून जा कायमचं,
एकमेकांशिवाय यापुढे आपण रहायच !

मला विसरून जा कायमचं,
एकमेकांशिवाय यापुढे आपण रहायच !
आपले रस्ते आहेत आता अलग थलग,     
तुला आता माझ्याशिवायच जगायचं !

मला विसरून जा कायमचं,
एकमेकांशिवाय यापुढे आपण रहायच !
पर्यायच नाही उरलाय आपल्या आयुष्यात
उरलेलं आयुष्य एकटेपणात काढायचं !

माझ्या मनाचा हाच आहे आशीर्वाद
तुझी ख्याती तुला लखलाभ, निर्विवाद
माझ्या मनाचा हाच आहे दुवा,
तुला मेहेरनजर मिळो साऱ्यांची अन दाद.

आता तूच उद्याचा किनारा शोध
आता तूच तुझा सहारा शोध
तूच घडव स्वतःला, तूच शिकव स्वतःला,
नव्या जीवनाचा घे तू बोध.

तू तुझेच गीत आहेस उद्याचे
तू तुझीच कथा आहेस उद्याची
तू गाणे लिही तुझ्या आयुष्याचे,
तूच हो कथेतील पात्र नायकाचे. 

स्वतःवर विश्वास ठेव, भरोसा ठेव
तूच आहेस तुझ्या स्वतःचI देव
तू करशील ती असेल योग्य दिशा,
तुला आहेत आता साऱ्या मोकळ्या दिशा.

तू आहेस उद्याचा उगवता सूर्य
मी आहे सायंकाळचा ढळता सूर्य
उद्याचे दिवस येतील तुला सोन्याचे,
ओढून घेईन मी पटल अंधाराचे.

तरी मला तू प्रत्येक बहरात पाहशील
तरी तू मला प्रत्येक कळीत ओळखशील
मला तू प्रत्येक ऋतूत पाहशील,
मला तू प्रत्येक ठिकाणी शोधशील.

माझी वफIच तुला कळून येईल
तुझे नि माझे नाते तेव्हा जुळून येईल
तोवर मला तू विसरत राहशील,
एक दिवस मिलनाचा असाही येईल.

केव्हातरी मग आपले होईल मिलन
केव्हातरी आपण होऊ दोघे एक
प्रेमात चुकलेले दोन जीव एकत्र येतील,
विरहात झुरलेल्या दोन काया एक होतील.

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-13.02.2023-सोमवार.
=========================================