विरह कविता-गीत-तुझ्या घराची वाट केव्हाच बदललीय, तुझ्या आठवणींनी वेदनाच दिलीय !

Started by Atul Kaviraje, February 15, 2023, 03:22:54 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला, एक विरह कविता-गीत ऐकवितो. "जिस गली में तेरा घर न हो बालमा, उस गली से हमे तो गुज़रना नहीं"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपली फेब्रुवारी महिन्याची ही बुधवार-दुपार आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे-(जिस गली में तेरा घर न हो बालमा, उस गली से हमे तो गुज़रना नहीं)
----------------------------------------------------------------------

          "तुझ्या घराची वाट केव्हाच बदललीय, तुझ्या आठवणींनी वेदनाच दिलीय !"
         ----------------------------------------------------------------

तुझ्या घराची वाट केव्हाच बदललीय,
तुझ्या आठवणींनी वेदनाच दिलीय !

तुझ्या घराची वाट केव्हाच बदललीय,
तुझ्या आठवणींनी वेदनाच दिलीय !
त्या घराची वीट न वीट ढासळलीय,
फक्त राखरांगोळीचं काय ती बाकी उरलीय !

तुझ्या घराची वाट केव्हाच बदललीय,
तुझ्या आठवणींनी वेदनाच दिलीय !
त्या घराने खूप पाहिल्या होत्या आशा,
फक्त निराशेचीच भिंत शिल्लक राहिलीय !

जिथे तुझे अस्तीत्वच नाही
जिथे तू स्वतःच नाहीस
ज्या घरात तुझे हास्य फुलत नाही,
तिथे येण्यात आता काहीच अर्थ नाही.

केव्हातरी होत ते भरलेलं
चार भिंतींनी ते सजलेलं 
तुझ्या हास्याने ते उमललेलं,
तुझ्या शब्दांनी ते झुललेलं.

त्या घराची रयाच गेलीय
त्या घराची शोभाच गेलीय
त्या गल्लीकडे पावले वळत नाहीत आता,
त्या घराचं घरपणचं गेलंय.

जीवनात कितीही बहार येवोत
जीवन रंगांत सजलेल असो
रंगीबेरंगी कळ्यांची फुले उमलोत,
तू नाहीस तर काहीच नाही.     

जीवन कितीही आनंदाने भरो
जीवनात कितीही ख़ुशी येवो
जीवनात हास्याचे झरे वाहोत, 
तुझ्याविना सारे फोलच आहे.

ज्या बागेत बहार नाही
जेथे कळ्याच उमलतं नाहीत
जिथे फुलेच फुलत नाहीत,
तिथे आनंद कुठून मिळेल मला ?

जिथे सारे काटेच भरलेत
झाड सारे निष्पर्ण झालेत
जेथे जीवनाचा नाही मागमूस,
तिथे येऊन मला काय मिळेल ?

तुझी पुन्हा मी आठवण काढतोय
तुझी पुन्हा एकदा वाट पाहतोय
जिथे असशील, तिथून परतून ये,
सर्व शपथI, सर्व वादे तू तोडून ये.

त्या प्रेमाची शपथ तुला
माझ्या शब्दाला जागून ये
माझ्या प्रेमाची आण तुला,
फक्त माझ्यासाठीच धावून ये.

अन्यथा माझा काही नाही भरोसा
इथून कायमचा निघून जाईन
तुझ्या आठवणीत दुःख नाही सोसायचे अजून,
हे जगच मी सोडून जाईन.

आता इथे माझे काहीच काम नाही
मला इथे थांबून काय मिळणार आहे ?
इथे तुझे वास्तव्यचं नाही प्रिये,
फक्त तुझ्या आठवणींचेच नवे घर आहे !

तुझ्या घराची वाट केव्हाच बदललीय,
तुझ्या आठवणींनी वेदनाच दिलीय !

तुझ्या घराची वाट केव्हाच बदललीय,
तुझ्या आठवणींनी वेदनाच दिलीय !
त्या घराची वीट न वीट ढासळलीय,
फक्त राखरांगोळीचं काय ती बाकी उरलीय !

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-15.02.2023-बुधवार.
=========================================