कटलेल्या पतंगासम,जीवनावरील कविता-गीत-जीवन भरकटत चालले आहे, निराशेनेच ते घेरले आह

Started by Atul Kaviraje, February 15, 2023, 03:41:54 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला, कटलेल्या पतंगासम, जीवनावरील कविता-गीत ऐकवितो. "न कोई उमंग है, न कोई तरंग है, मेरी ज़िंदगी है क्या, इक कटी पतंग है"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपली फेब्रुवारी महिन्याची ही बुधवार-दुपार आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे-(न कोई उमंग है, न कोई तरंग है, मेरी ज़िंदगी है क्या, इक कटी पतंग है)
-----------------------------------------------------------------------

                   "जीवन भरकटत चालले आहे, निराशेनेच ते घेरले आहे !"
                  -------------------------------------------------

जीवन भरकटत चालले आहे,
निराशेनेच ते घेरले आहे !

जीवन भरकटत चालले आहे,
निराशेनेच ते घेरले आहे !
कधी उमंग होती, कधी उमेद होती,
आकांक्षांनी कधीच घर सोडले आहे.

जीवन भरकटत चालले आहे,
निराशेनेच ते घेरले आहे !
कधी उत्साह होता, कधी आनंद होता,
आशेने केव्हाच तोंड फिरवले आहे.

तुटलेल्या पतंगासारखी माझी अवस्था आहे
दिशाहीन, चालला आहे, मंजीलच नाही
पतंगाची डोर तुटून माझ्या,
वाऱ्यासवे हेलकावत चालला आहे.

माझे जीवन तो एक पतंगचं आहे
ना त्याला थारा, ना त्याला ठिकाणा
आज त्या पतंगासारखी मी स्थिर नाही,
माझी डोर आज कुणाच्याच हाती नाही.

जीवनात एकामागोमाग एक दुःखे येऊन गेली
डोली नाही, माझी जणू अर्थीच उठली
तेव्हा माझे अश्रू कुणी नाही पुसले,
आजही कुणी त्यात भागीदारी नाही केली.

हे अश्रूच माझी साथ करीत आहेत
तेव्हाही होते, आजही आहेत, उद्याही असतील
हे दुःख माझ्याबरोबरच चालत आहे,
तेव्हाही होते, आजही आहे, उद्याही असेल.

माझ्या आयुष्यातील सारी बहरच सरलीय
निष्पर्ण, निष्प्राण माझं आयुष्य उरलंय
यापुढेही याच रूपात मी असेन,
यापुढेही याच रंगात मी दिसेन.

जीवनातला प्रकाशच नाहीसा होऊन
अंधाऱ्या गर्भात लुप्त झालाय
आशेचा किरण दिसला होता केव्हातरी,
साऱ्या इच्छा मावळल्यात, सुप्त झाल्यात.

आता त्या पतंगाचेच जीवन जगायचे
कधी इथे भरकटायचे, तर कधी तिथे
वादळात सापडलेली नाव जणू,
कधी इथे हेलपाटायचे, तर कधी तिथे.

दिशाहीन, अंतहीन उडत जायचे, पतंगापरी
जणू भंगलेली नाव तुटत फुटत लागे किनारी
हीच माझी नियती आहे, हेच माझे नशीब आहे,
हेच माझे भाकीत आहे, हेच माझे प्राक्तन आहे.

जीवन भरकटत चालले आहे,
निराशेनेच ते घेरले आहे !

जीवन भरकटत चालले आहे,
निराशेनेच ते घेरले आहे !
कधी उमंग होती, कधी उमेद होती,
आकांक्षांनी कधीच घर सोडले आहे

जीवन भरकटत चालले आहे,
निराशेनेच ते घेरले आहे !
कधी उत्साह होता, कधी आनंद होता,
आशेने केव्हाच तोंड फिरवले आहे

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-15.02.2023-बुधवार.
=========================================