रडू नकोस, हे अश्रू वाया दवडू नकोस, मोतीच आहेत ते, असे मातीमोल करू नकोस !

Started by Atul Kaviraje, February 16, 2023, 06:42:11 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला एक, अश्रुंवरती कविता-गीत ऐकवितो. "काहे को रोए, काहे को रोए, सफल होगी तेरी आराधना"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपली फेब्रुवारी महिन्याची ही सांज-गुरुवार आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे-(काहे को रोए, काहे को रोए, सफल होगी तेरी आराधना)
----------------------------------------------------------------

"रडू नकोस, हे अश्रू वाया दवडू नकोस, मोतीच आहेत ते, असे मातीमोल करू नकोस!"
--------------------------------------------------------------------------

रडू नकोस, हे अश्रू वाया दवडू नकोस,😂
मोतीच आहेत ते, असे मातीमोल करू नकोस !

रडू नकोस, हे अश्रू वाया दवडू नकोस,😂
मोतीच आहेत ते, असे मातीमोल करू नकोस !
तुझ्या तपस्येला फळ निश्चित मिळेल,
अशी तू निराश होऊ नकोस !😒

रडू नकोस, हे अश्रू वाया दवडू नकोस,😂
मोतीच आहेत ते, असे मातीमोल करू नकोस !
तुझी आराधना नक्कीच येईल फळाला,
तू अशी उदास होऊ नकोस 😒

एक ना एक दिवस तुला प्रचिती येईलच
तुझी निराशा, आशेत परावर्तित होईलच
तोवर तुझे अखंड तप सुरु ठेव,
तोवर तुझे हे खडतर व्रत सुरु ठेव.

तुझे हृदय विशाल आहे सागरासमान
तुझे मन उत्तुंग आहे अंबरIसमान
हे तुफानही तू सहजी सामावून घेशील,
या वादळालाही तू सहजच झेपवशील.

अशी हतोत्साही होऊ नकोस
अशी निरुत्साही होऊ नकोस
धीर धर, तुझ्या हुंदक्यांना तू आवर, 
अश्रूंना तोलून धर तू पापण्यांवर. 😂

दिवा बनलेला तर मातीचाच असतो
पेटला तर तो ज्वाळाही बनतो
तुझ्या आसवांना थांबव, त्यांना रोख,
फार किंमती आहेत ते, त्यांना ओळख.

वाहून गेले तर ते पाणीच असतात
डोळ्यांत तरले तर ते मोतीच बनतात
हे मोती तुझ्या डोळ्यातील ज्योती आहेत,
त्यांना वाया घालवू नकोस, अशी जाळू नकोस.

केव्हातरी दुःखाची झळ लागते
केव्हातरी सुखाची सावली येते
सुख दुःख जीवनाच्या दोन बाजू,✌
म्हणून का आपण त्यांना ठेवतो बाजूस ?

जीवन ही जणू बागच असते
आपणच त्याला आपल्या परीने सिंचत असतो
कधी फुलांसोबत काट्यानाही आपण,
नकळत माळेत गुंफत असतो.

रडू नकोस, हे अश्रू वाया दवडू नकोस,😂
मोतीच आहेत ते, असे मातीमोल करू नकोस !

रडू नकोस, हे अश्रू वाया दवडू नकोस,😂
मोतीच आहेत ते, असे मातीमोल करू नकोस !
तुझ्या तपस्येला फळ निश्चित मिळेल,
अशी तू निराश होऊ नकोस !😒

रडू नकोस, हे अश्रू वाया दवडू नकोस,😂
मोतीच आहेत ते, असे मातीमोल करू नकोस !
तुझी आराधना नक्कीच येईल फळाला,
तू अशी उदास होऊ नकोस 😒

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-16.02.2023-गुरुवार.
=========================================