II ओम नमः शिवाय II-महाशिवरात्री-कविता-4-पहिला श्रावण सोमवार...!

Started by Atul Kaviraje, February 18, 2023, 11:03:59 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                  II ओम नमः शिवाय II 
                                       महाशिवरात्री
                                 ---------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१८.०२.२०२३-शनिवार आहे. आज महाशिवरात्रीची पावन रात्र आहे. प्रत्येक महिन्यातल्या कृष्ण पक्षातील त्रयोदशीयुक्त चतुर्दशीला शिवरात्री असते. मात्र माघ महिन्यातील शिवरात्रीचा महिमा मोठा आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी सर्व हिंदू बांधव उपवास करतात, भगवान शिवाची आराधना आणि प्रार्थना करून दुसऱ्या दिवशी उपवास संपवतात. हिंदू कॅलेंडरनुसार, महाशिवरात्री (Mahashivratri 2023) हा सण फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला साजरा केला जातो. या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह झाला. म्हणूनच दर महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशीला मासिक शिवरात्रीही साजरी केली जाते. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण कवी-कवियत्री याना महाशिवरात्रीच्या अनेक वंदनीय शुभेच्छा. वाचूया या महापर्वावर शिव शंकराच्या काही कविता.

                                "पहिला श्रावण सोमवार...!"
                               -------------------------

श्रद्धेचे वारे वाहता

दक्षिणेकडून

उत्तरेस जाऊन पोहचले....!


अचम्बित करणारी

निसर्गाची लीला

पाहून थक्कची झाले....!


महादेवाची ख्याती

मोठी जी उत्तरेहून

निघून दक्षिणेस पोहोचली....!


सारा हिंदुस्तान

व्यापुनी जगती

जी अजरामर झाली....!


जटाधारी देवाधीदेव

त्रिनेत्रधारी जय शंभू महादेव

ब्रम्हांडी निलकंठ म्हणुनी नावाजला....!


ज्याने जगतास या

ओमकार शब्द ध्वनी

परमेश्वर जाणण्यास्तव आम्हा दिला....!


रूप त्या शब्दाचे

मनोहर निसर्गात या

पुष्प रूपे असे त्यानेच दाविले....!


किमया ही सारी

त्या प्रभूची पाहुनी निःशब्द झाली वाणी

ज्याची नियोगे नारळातही वसते पाणी....!


कोणी काही म्हणो

ओंकारातून दर्शन आम्हा

त्या जगदीश्वराचे आज झाले....!


पुन्हा एकदा अस्तित्व

त्याचे निसर्गातून प्रकटता

पाहुनी देवधीदेवा जीवन कृथार्थ झाले....!


हे शिव शंकरा नमन तुला

आशीर्वाद तुझा घेण्याला

अशीच कृपा अखंड राहूदे तुला पाहण्याला...!

--प्रशांत शिंदे
------------

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-स्टोरी मिरर.कॉम)
                    -----------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-१८.०२.२०२३-शनिवार.
=========================================