देवाच्या प्रार्थनेची कविता-देवा असा निष्ठुर होऊ नकोस, मला अश्या यातना देऊ नकोस !

Started by Atul Kaviraje, February 18, 2023, 11:45:54 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला, देवाला केलेल्या प्रार्थनेची कविता-गीत ऐकवितो. "ओ दुनिया के रखवाले, सुन दर्द भरे मेरे नाले"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपली फेब्रुवारी महिन्याची ही शनिवार-रात्र आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे-(ओ दुनिया के रखवाले, सुन दर्द भरे मेरे नाले)
-------------------------------------------------------

             "देवा असा निष्ठुर होऊ नकोस, मला अश्या यातना देऊ नकोस !"
            ---------------------------------------------------------

देवा, असा निष्ठुर होऊ नकोस,
मला अश्या यातना देऊ नकोस !

देवा, असा निष्ठुर होऊ नकोस,
मला अश्या यातना देऊ नकोस !
माझी दुःखभरी फर्याद कोण ऐकेल आता,
तुही असा पाठ फिरवू नकोस !

देवा, असा निष्ठुर होऊ नकोस,
मला अश्या यातना देऊ नकोस !
या दुःखिताचे दुःख तू समजून घे,
तू असा कठोर होऊन नकोस !

या माणसाला तूच तर घडवलेस
जीवनी आशा-निराशेचे रंग तूच भरलेस
तू सारे त्याच्यावर सोडून देऊ नकोस,
असहाय्यतेवर त्याच्या तू हसू नकोस !

वादळातून वाचण्यासाठी तूच नाव पाठवलीस
प्रलयातून वाचवलंस, नाव किनारी लावलीस
तूच त्याच्या मिलनाचा सारा घाट घालतोस,
आणि सोबत त्याला तू जुदाईही देतोस ?

आज मी फिरतोय सारीकडे मारा मारा
कोणाचाही नाही आज मज सहारा
अशी शिक्षा शत्रूलाही मिळू नये,
कुठल्या जन्माचा बदल तू घेतोस !

आज माझे प्रीतीचे शहर हरवलंय
आज माझी प्रेम नगरी लुटून गेलीय
तुला दया कशी नाही येत, ईश्वरI,
असा कसा तू निर्दयी होतोस !

या बरसणाऱ्या धारा मला ज्वाळाच भासताहेत
हा फुलांचा वर्षाव मला चटकाच देतोय
सारे सारे मनाच्या विपरीतच माझ्या घडतंय,
हे सारं तू कसं काय पाहू शकतोस ?

ही सुहावनी रात्र जणू नागीणच बनून डसलीय   
ही अंधारी रात्र जणू वैरीणच होऊन आलीय
शीतल चंद्राची किरणे तन जाळून टाकताहेत, 
चांदण्याचा प्रकाश मनाला झळा देताहेत.

आता माझं कुणीच नाही या जगात
मृगजळही नाही दिसत या विराण वाळवंटात
मला आता मरणच दे, हे ईश्वरा,
आयुष्य झालंय भकास, अर्थ नाही उरलाय जगण्यात.

जसं चंद्राला हा सूर्य शोधत आहे
जसं संध्येला ही सकाळ शोधत आहे
सारे जण एकमेकांना शोधताहेत,
पण कुणीच कुणाला गवसत नाही.

तसंच आहे माझं नशीब, प्रभो
हीच असेल माझी नियती, देवा
केव्हापासून आहेत नयन प्रतीक्षेत प्रेमाच्या,
जवळ असूनही ते कधीच सापडलं नाही.

तरीही मी हरणार नाही, ईश्वरा
मी माझ्या नशिबालाही हरवेन, देवा
ते माझ्या विरुद्ध जरी गेलं,
तरी, माझं मन मला ग्वाही देतंय.

चालून चालून पाय छलनी झालेत
वाटेत असह्य दुःखभरे काटे भरलेत
तरी एक आस उरी घेऊन भटकतोय,
माझ्या हरवलेल्या प्रेमाला मी शोधतोय.

आज साऱ्या वाटा सुनसान आहेत
आज सारे महाल उदास आहेत
आज घराला घरपण नाही उरलंय,
आज चारी भिंती उध्वस्तच आहेत.

माझं मन आज दुःखाने भरलंय
सुखाने माझ्याशी आज नातं तोडलंय
वाटतंय, माझी दुनिया उजाडूनच गेलीय,
वाटतंय, ही बहार माझ्यावर नाराज झालीय.   

तुझं देऊळही आज नव्याने उभं राहतंय
तुझ्या मूर्तीलाही नवं स्थान मिळतंय
पण माझं काय, मी कसं जगू या जगात ?
माझं मन-मंदिर कायमचंच उजाड होतंय !

आता मला कोण सांभाळणार, देवा ?
आता माझ्या मनाला कोण समजावणार ?
तुझ्याकडे माझी याचना आहे, परमेश्वरI,
या पामराचा आता तूच कर उद्धार !

देवा असा निष्ठुर होऊ नकोस,
मला अश्या यातना देऊ नकोस !

देवा असा निष्ठुर होऊ नकोस,
मला अश्या यातना देऊ नकोस !
माझी दुःखभरी फर्याद कोण ऐकेल आता,
तुही असा पाठ फिरवू नकोस !

देवा असा निष्ठुर होऊ नकोस,
मला अश्या यातना देऊ नकोस !
या दुःखिताचे दुःख तू समजून घे,
तू असा कठोर होऊन नकोस !

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-18.02.2023-शनिवार.
=========================================