II छत्रपती शिवाजी महाराज जयंती II-शुभेच्छा-स्टेटस-3

Started by Atul Kaviraje, February 19, 2023, 10:41:18 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                            II छत्रपती शिवाजी महाराज जयंती II
                           ---------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१९.०२.२०२३-रविवार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची तारखेनुसार आज जयंती आहे. छत्रपती शिवाजी महाराज स्वत:च राज्य निर्माते होते. शुन्यातून जग निर्माण करण्याची जिद्द व हिंमत त्यांच्यात होती. मातोश्री जिजाबाईंचे प्रोत्साहन, गुरुवर्य दादोजी कोंडदेव यांचे मार्गदर्शन आणि मावळ्यांच्या मदतीने त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. जिजाऊंचं एकच स्वप्न होतं, ते म्हणजे मराठी स्वराज्याची स्थापना करायचं. छत्रपतींनी आपल्या मुत्सद्दीगिरी, शौर्य व आत्मबळावर हे स्वप्न साकार करुन दाखविलं. (१९ फेब्रुवारी १६३०) ही शिवरायांची जन्मतारीख स्वीकारली. त्याप्रमाणे महाराष्ट्र सरकार दरवर्षी १९ फेब्रुवारी या दिवशी सुटी जाहीर करते. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी कवी-कवियत्रीस छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. वाचूया, शिवाजी महाराजांवर काही स्टेटस.   

=========================================
😠 ताशे तडफणार ...

ह्रदय❤ धडकणार ...

😎 मन थोडे भडकणार ......

पण या देशावरच 🇮🇳⚔काय ...

🌍अख्याजगावर🌎

" 19_फेब्रुवारी " ला "🚩भगवा🚩" झेंडा फडकणार ...🚩🚩🚩🚩

🚩 जयशिवराय
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
--जिथे शिवभक्त उभे राहतात
तिथे बंद पडते भल्या भल्यांची मती
अरे मरणाची कुणाला भीती
आदर्श आमचे राजे शिवछत्रपती

--एक राजा जो रयतेसाठी जगला
एक योद्धा जो अन्यायाविरुद्ध लढला
एक नेता जो लोकहितासाठी झटला
एक असामान्य माणूस ज्याने
गुलामी नाकारून स्वराज्याला जन्म दिला

--रायगडी_मंदीरी_वसे_माझा_राया

चरणाशी_अर्पितो_अजन्म_ही_काया

जगदीश्वराशी_जोडली_ज्यांची_ख्याती

प्रथम_वंदितो_मी_तुम्हा_छत्रपती शिवराया🚩🐅🚩🐆
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
--१ वेळ दिवाळी आम्ही शांत करीन

पण शिवजयंती अशी करनार

की भागात काय

जगात चर्चा झाली पाहीजे....

जगात भारी... १९ फेब्रुवारी....

आम्ही फक्त शिवरायांचे भक्त
🌺🌺🌺🌺🌺

🌺🌺🌺🌺🌺
--उंच आकाशी झेप ज्ञानाची असेल तर,
गरुडासारखा बळ हवं.
दरीत झेप घ्यायची असेल तर,
नभाएवढं धाडस हवं.
पाण्यात उसळी घ्याची असेल तर,
माशासारखी कला हवी.
अन साम्राज्य निर्माण करायच असेल तर,
शिवबाचच काळीज हवं.

--शिवबा शिवाय किंमत नाय.......

शंभू शिवाय हिंमत नाय...

भगव्या शिवाय नमत नाय....

शिवराय सोडून कोणापुढे झुकत नाय

जय जिजाऊ जय शिवराय.....
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
--इतिहासाच्या पानावर,
रयतेच्या मनावर,
मातीच्या कणावर आणि
विश्वासाच्या प्रमाणावर
राज्य करणारा राजा म्हणजे
राजा शिवछत्रपती.
=========================================

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी चारोळी.इन)
                     -------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-19.02.2023-रविवार.
=========================================