II छत्रपती शिवाजी महाराज जयंती II-शुभेच्छा-स्टेटस-7

Started by Atul Kaviraje, February 19, 2023, 10:47:42 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                            II छत्रपती शिवाजी महाराज जयंती II
                           --------------------------------- 

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१९.०२.२०२३-रविवार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची तारखेनुसार आज जयंती आहे. छत्रपती शिवाजी महाराज स्वत:च राज्य निर्माते होते. शुन्यातून जग निर्माण करण्याची जिद्द व हिंमत त्यांच्यात होती. मातोश्री जिजाबाईंचे प्रोत्साहन, गुरुवर्य दादोजी कोंडदेव यांचे मार्गदर्शन आणि मावळ्यांच्या मदतीने त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. जिजाऊंचं एकच स्वप्न होतं, ते म्हणजे मराठी स्वराज्याची स्थापना करायचं. छत्रपतींनी आपल्या मुत्सद्दीगिरी, शौर्य व आत्मबळावर हे स्वप्न साकार करुन दाखविलं. (१९ फेब्रुवारी १६३०) ही शिवरायांची जन्मतारीख स्वीकारली. त्याप्रमाणे महाराष्ट्र सरकार दरवर्षी १९ फेब्रुवारी या दिवशी सुटी जाहीर करते. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी कवी-कवियत्रीस छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. वाचूया, शिवाजी महाराजांवर काही स्टेटस.   

=========================================
🌺🌺🌺🌺🌺
--भगव्याची_साथ कधी सोडणIर नाही

भगव्याचे_वचन कधी मोडणIर नाही

दिला तो अखेरचा शब्द

होई काळ ही स्तब्ध

ना पर्वा फितुरीची,

नसे पराभवाची_खंत

आम्ही_आहोत_फक्त_

राजे_शिवछञपतींचे_भक्त

जय_शिवराय

जगदंब_जगदंब
🌺🌺🌺🌺🌺

🌺🌺🌺🌺🌺
--मराठा राजा महाराष्ट्राचा

म्हणती सारे माझा – माझा

आजही गौरव गिते गाती

ओवाळूनी पंचारती

तो फक्त "राजा शिवछत्रपती"

|| जय जिजाऊ ||

|| जय शिवराय ||
🌺🌺🌺🌺🌺

🌺🌺🌺🌺🌺
--चार शतक होत आली,

तरी नसानसांत राजे

आले गेले कितीही

तरी मनामनात राजे

स्वराज्य म्हणजे राजे

स्वाभिमान म्हणजे राजे

🔥शिवजयंतीच्या लक्ष-लक्ष शुभेच्छा🚩
🌺🌺🌺🌺🌺

🌺🌺🌺🌺🌺
--राजे... !!!
छ :- छत्तीस हत्तीचे बळ असणारे,
त्र :- त्रस्त मोगलांना करणारे,
प :- परत न फिरणारे,
ति :- तिन्ही जगात जाणणारे,
शि :- शिस्तप्रिय,
वा :- वाणिज तेज,
जी :- जीजाऊचे पुत्र,
म :- महाराष्ट्राची शान,
हा :- हार न मानणारे,
रा :- राज्याचे हितचिंतक,
ज :- जनतेचा राजा,
म्हणजे,
छत्रपति शिवाजी महाराज

🚩 # नजऱ तुमची # झलक आमची ... # वंदन करतो

# शिवरायांना🚩

# हात जोड़तो # जिजामातेला ...

# प्रार्थना करतो # तुळजा # भवानीला🚩

# सुखी # ठेव नेहमी

# साखरे # पेक्ष्या गोड माझ्या # शिव # भक्तानां....

🚩 # जगदंब # जगदंब 🚩

🚩🚩 # जय # शिवराय🚩🚩
🌺🌺🌺🌺🌺
=========================================

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी चारोळी.इन)
                    -------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-19.02.2023-रविवार.
=========================================