दिन-विशेष-लेख-जागतिक सूर्यनमस्कार दिन

Started by Atul Kaviraje, February 19, 2023, 11:27:59 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                 "दिन-विशेष-लेख"
                             "जागतिक सूर्यनमस्कार दिन"
                            --------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१९.०२.२०२३-रविवार आहे, फेब्रुवारी १९ हा दिवस " जागतिक सूर्यनमस्कार दिन" म्हणूनही ओळखला जातो. वाचूया, तर या दिवसाचे महत्त्व, आजच्या या "दिन-विशेष-लेख" या शीर्षकI-अंतर्गत. .

      जागतिक सूर्यनमस्कार दिन: मस्तकापासून तळपायापर्यंत विकारमुक्ती उपाय
      सूर्यनमस्कार--
     ------------------------------------------------------------------

     मस्तकापासून तळपायापर्यंत सर्व विकार नष्ट करण्यासाठी सूर्यनमस्काराचा उपयोग केला जातो. आसने आणि प्राणायाम या दोन्हींचा अंतर्भाव असलेला हा व्यायाम प्रकार आहे. सूर्यनमस्कारामुळे हृदय व फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढते. सोलापूरकरांमध्ये सूर्यनमस्काराची आवड निर्माण होण्यासाठी विविध संस्थांसह तरुणाई प्रयत्न करीत आहे.

     १९ फेब्रुवारी हा दिवस जागतिक सूर्यनमस्कार दिन म्हणून साजरा केला जातो. परंतु, दैनंदिन जीवनात याचा सराव आवश्‍यक आहे. आजच्या आधुनिक युगात विकृती शास्त्रातील आधुनिक तंत्रज्ञानामुळे शरीरातील सूक्ष्म दोष, रोगजंतूचे अचूक निदान उपलब्ध आहेत, पण रोगनिदानासाठी काहीवेळा उपचारापेक्षा जास्त खर्च येतो आणि यात मानवी मन, भाव, भावना याचा कोणताच विचार केला जात नाही. शिथीलकरणाचे व्यायाम झाल्यावर आधी सूर्यनमस्कार घातल्याने शरीरातील ताठरपणा कमी होतो व आसनासाठी आवश्‍यक असलेला लवचिकपणा प्राप्त होतो.

     सूर्यनमस्कार हा सूर्योदय व सूर्यास्त या दोन्हीवेळी घातले जाऊ शकतात. प्रारंभी सूर्याकडे तोंड करून दोन्ही हाताची नमस्कार मुद्रा करावी. सूर्यनमस्कार घालण्याच्या दोन पद्धती आहेत. पहिल्या पद्धतीत 12 अंकात व दुसरे पद्धतीत 10 अंकात घातले जाऊ शकतात. सूर्यनमस्कारामध्ये एकूण 10 स्थिती असतात. प्रत्येक स्थितीत एक आसन समाविष्ट असते. म्हणजे पूर्ण सूर्यनमस्कारात 10 आसने असतात. त्यामुळे त्या आसनामुळे शरीराला लाभ होतात. जसे पहिल्या स्थितीला प्रार्थना आसन, दुसऱ्या स्थितीला ताडासन, तिसऱ्या स्थितीत उत्तानाअसन, चौथ्या स्थितीत एकपाद प्रसरणासन, पाचव्या स्थितीला चतुरंग दंडासन, सहाव्या स्थितीला अष्टांगआसन, सातव्या स्थितीला भुजंगआसन, आठव्या स्थितीला अधोमुंख श्‍वासनासन, नवव्या स्थितीला एकपादप्रसरणासन, दहाव्या स्थितीला उत्तानासन.

     सूर्यनमस्कार हा विषय सर्व पातळीवर पोचवावा यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न चालू आहेत, असे प्रशिक्षक स्वप्नील हरहरे यांनी सांगितले.

                 सूर्यनमस्काराचे फायदे--

     हृदय व फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढते. बाहु व कंबर यांचे स्नायू बळकट होतात. सर्व महत्त्वाच्या अवयवांना रक्‍त पुरवठा होतो. पाठीचा कणा, मणका आणि कंबर लवचिक होते. पचनक्रिया सुधारते. मनाची एकाग्रता वाढते. पोटाजवळची चरबी वितळून वजन कमी होण्यास मदत होते.

--परशुराम कोकणे
-----------------

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-इ सकाळ.कॉम)
                    ----------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-१९.०२.२०२३-रविवार. 
=========================================