अतृप्त

Started by शिवाजी सांगळे, February 22, 2023, 03:25:00 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

अतृप्त

रंग उधळले नभी मन तृप्त झाले..आता
सोडवित कवेतून निशा जागविते आता

आभा नवकेशराची चौफेर पांगली अशी
उत्साह भरते सर्व सृष्टीला लाभले आता

गंधधुंद चैतन्यदायी प्रभा रवी किरणांची
नव उन्मेष जगण्या आम्हात पेरते आता

न्हाऊन निघते चराचर रंगात या एकल्या
वाटे जणू नेसले धरेने सुवर्ण वस्त्र आता

चमत्कार सारा कसा...रोज घडतो असा
होऊनही तृप्त वाटते मना अतृप्त आता

©शिवाजी सांगळे 🦋papillon
 संपर्क: +९१ ९५४५९७६५८९
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९