२२-फेब्रुवारी-दिनविशेष

Started by Atul Kaviraje, February 22, 2023, 09:14:48 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-२२.०२.२०२३-बुधवार. जाणून घेऊया,आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"

                                    "२२-फेब्रुवारी-दिनविशेष"
                                   -----------------------

-: दिनविशेष :-
२२ फेब्रुवारी
जागतिक बालवीर दिवस
World Scout Day
सेंट लुशियाचा स्वातंत्र्यदिन
=========================================
अ) महत्त्वाच्या घटना:
   ----------------
१९७९
'सेंट लुशिया' ला (ब्रिटनपासून) स्वातंत्र्य मिळाले.
१९७८
श्री. यशवंत विष्णू चंद्रचूड यांनी भारताचे १६ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला. या पदावर सर्वात प्रर्दीघ काळ (२६९६ दिवस) त्यांनी काम केले.
१९४८
झेकोस्लोव्हाकियामध्ये कम्युनिस्ट क्रांती.
१९४२
दुसरे महायुद्ध – फिलिपाईन्समध्ये जपानी सैन्याकडुन पराभव अटळ दिसत असल्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष एफ. डी. रूझवेल्ट यांनी जनरल डग्लस मॅकआर्थरला माघार घ्यायचा हुकुम दिला.
१८१९
स्पेनने फ्लोरिडा हा प्रांत अमेरिकेला ५० लाख डॉलरच्या मोबदल्यात विकला.
=========================================
ब) जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  -----------------------------
१९२२
>व्ही. जी. जोग – व्हायोलिनवादक
(मृत्यू: ३१ जानेवारी २००४)
१९२०
इफ्तिखार – चरित्र अभिनेता
(मृत्यू: ४ मार्च १९९५)
१९०२
फ्रिट्झ स्ट्रासमान – जर्मन भौतिकशात्रज्ञ
(मृत्यू: २२ एप्रिल १९८०)
१८५७
हेन्‍रिच हर्ट्‌झ – जर्मन भौतिकशास्त्रज्ञ
(मृत्यू: १ जानेवारी १८९४)
१८५७
लॉर्ड बेडन पॉवेल – बालवीर (Scout) चळवळीचे प्रणेते
(मृत्यू: ८ जानेवारी १९४१)
१८३६
महामहोपाध्याय पण्डित महेशचंद्र 'न्यायरत्‍न' भट्टाचार्य
(मृत्यू: १२ एप्रिल १९०६)
१७३२
जॉर्ज वॉशिंग्टन – अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष
(मृत्यू: १४ डिसेंबर १७९९)
=========================================
क) मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
    -------------------------
२००९
लक्ष्मण देशपांडे – 'वर्‍हाड निघालंय लंडनला' एकपात्री प्रयोगासाठी प्रसिद्ध असलेले कलाकार, लेखक, दिग्दर्शक व प्राध्यापक
(जन्म: ५ डिसेंबर १९४३)
२०००
विनायक सदाशिव तथा वि. स. वाळिंबे – लेखक व पत्रकार
(जन्म: ११ ऑगस्ट १९२८)
२०००
दामोदर दिनकर तथा मधुकाका कुलकर्णी – प्रकाशन व्यवसायात नवनवीन प्रयोगांसाठी ख्याती मिळवलेले प्रकाशक, 'श्री विद्या प्रकाशन'चे संस्थापक
(जन्म: २३ आक्टोबर १९२३)
१९८२
जोश मलिहाबादी – ऊर्दू कवी
(जन्म: ५ डिसेंबर १८९४)
१९५८
मौलाना अबूल कलाम आझाद – स्वातंत्र्यचळवळीतील विद्वान नेते, भारताचे पहिले शिक्षणमंत्री, भारतरत्‍न
(जन्म: ११ नोव्हेंबर १८८८)
१९४४
कस्तुरबा गांधी यांचे पुण्यातील आगाखान पॅलेसमधे निधन
(जन्म: ११ एप्रिल १८६९)
१९२५
सर थॉमस क्लिफोर्ड ऑलबट – ज्वरमापीचा (Clinical thermometer) शोध लावणारे इंग्लिश डॉक्टर
(जन्म: २० जुलै १८३६ - ड्युजबरी, यॉर्कशायर, इंग्लंड)
१८२७
स्मिथसन टेनांट – हिरा हा कार्बनच असतो हे प्रयोगावरुन सिद्ध करणारे ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ. त्यांनी ऑस्मिअम व इरिडिअम या मूलद्रव्यांचा शोध लावला. त्यांच्या सन्मानार्थ तांब्याच्या एका धातुकाला टेन्नाटाईट (Cu12As4S13) असे नाव दिले आहे.
(जन्म: ३० नोव्हेंबर १७६१)
=========================================

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-22.02.2023-बुधवार. 
=========================================