कशासाठी?

Started by justsahil, September 12, 2010, 02:14:47 AM

Previous topic - Next topic

justsahil

कशासाठी?

नशीब उजळून पुन्हा खाईत पडतं
कशासाठी?
जगात सत्य असताना असत्य
कशासाठी?
विश्वासू माणूसच विश्वासघात करतो
कशासाठी?
सूर्य असताना देखील अंधार पडतो
कशासाठी?
इच्छा असताना देखील पूर्ण होत नाहीत
कशासाठी?
ओठांवर स्मित मग डोळ्यात आसवं
कशासाठी?
आनंदाच्या क्षणीसुद्धा चिंता भेडसावते
कशासाठी?
आयुष्याशी जुळवून घेताना आयुष्यच संपणार मग...
प्रेमाच्या विरहाचे दुखं कशासाठी?


Author Unknown