मला आवडलेला निबंध-निबंध क्रमांक-131-लेक वाचवा लेक शिकवा-मुलगी वाचवा मुलगी शिकवा

Started by Atul Kaviraje, February 24, 2023, 10:10:31 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                  "मला आवडलेला निबंध"
                                     निबंध क्रमांक-131
                                 ----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला निबंध", या निबंध-मालिकेतील एक महत्त्वाचा निबंध. या निबंधाचे शीर्षक आहे- "लेक वाचवा लेक शिकवा-मुलगी वाचवा मुलगी शिकवा"

     भारतीय संस्कृतीत स्त्री ला देवी मानले जाते. परंतु आज आपल्या देशात स्त्री भ्रूण हत्येचे प्रमाण वाढले आहे. भारतात प्रती पुरुष स्त्रियांचे प्रमाण कमी आहे. म्हणूनच मुलगी वाचवा मुलगी शिकवा अभियान देशात मोठ्या प्रमाणात राबवले जात आहे.

     आजच्या या लेखात आपण Mulgi vachva mulgi shikva nibandh पाहणार आहोत. हा मराठी निबंध आपण शाळा कॉलेज परीक्षांमध्ये वापरू शकतात.   

     आपल्या धार्मिक ग्रंथात लिहिले आहे "यत्र नार्यस्तु पुजयन्ते रमन्ते तंत्रज्ञ देवता" याचा अर्थ होतो की जेथे नारीचा अर्थात स्त्रीचा आदर सन्मान केला जातो तेथेच परमेश्वराचा वास असतो. परंतु वैदिक काळातील आपली ती संस्कृती आता मात्र पुस्तकांपुरती मर्यादित झाली आहे. आधुनिक भारत एवढा आधुनिक झालाय की आता याने मुलींकडून जगण्याचा अधिकार देखील हिसकावून घेतला आहे. जन्म मृत्यू परमेश्वराच्या हातात असते. परंतु आपल्यामधील काही लोक स्वताला परमेश्वर समजत गर्भात असणाऱ्या बाळाला फक्त एवढ्यासाठी मारून टाकतात कारण ती एक मुलगी असतें.

     आपल्या देशात प्रति पुरुष महिलांच्या संख्येत खूप जास्तीचे अंतर दिसून येते. या मुळेच देशात लेक वाचवा किंवा मुलगी वचवा मुलगी शिकवा या अभियानाची सुरुवात करण्यात आली. आपला देश पूर्वीपासून पुरुषप्रधान आहे. म्हणून स्त्रियांवरील अत्याचार दिवसेंदिवस वाढत आहेत. मुलगी वाचवा अभियानाचा प्रमुख उद्देश देशात स्त्रियांची संख्या वाढवून त्यांच्यावर होत असलेल्या अत्याचाराला कमी करणे हा होता. आज जेवढा आपला देश आणि समाज विकसित होत आहे. तेवढेच स्त्रियांवरील अत्याचार आणि हिंसेचे प्रमाणत वाढत आहे.

     आजचे विज्ञान जेवढे आपल्या साठी वरदान आहे तेवढेच अभिशाप देखील आहे. दवाखाने, मेडिकल व औषधी मनुष्याच्या चांगल्यासाठी बनवण्यात आले. परंतु काही लोकांनी या सुविधांचा अयोग्य पद्धतीने वापर सुरू केला. याचे ताजे उदाहरण सोनोग्राफी आणि अल्ट्रासाउण्ड मशीन आहे. ज्याच्या मदतीने गर्भात असणाऱ्या बाळाचे लिंग लक्षात येते. परंतु यात चूक विज्ञान किंवा वैज्ञानिक शोधांची नसून त्याचा अयोग्य उपयोग करणाऱ्यांची आहे.

     1991 च्या जनगणनेनुसार देशात पुरुषांच्या तुलनेत मुलींच्या संख्येत खूप कमी पाहण्यात आली. तेव्हापासून या गोष्टीकडे लक्ष देण्यात आले. परंतु तरीही यानंतर 2001 च्या राष्ट्रीय जनगणनेत मोठ्या प्रमाणात महिलांच्या संख्येत घट आढळली. सन 2001 नंतर 2011 च्या जनगणनेत देशातील प्रति पुरुष महिलांची संख्या 918/1000 झाली. ही संख्या 2001 पेक्षा अजून कमी झाली. जर देशातील महिलांची संख्या अश्याच पद्धतीने कमी होत राहिली तर एक दिवस महिलांची ही संख्या शून्य स्थितीत येऊन जाईल.

     परंतु 22 जानेवारी 2015 ला शासनाने स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी कठोर कायदे तयार केले. या कायद्यानुसार जर कोणीही व्यक्ती किंवा डॉक्टर गर्भाचा लिंग तपासात असेल तर त्याला कठोर दंड व शिक्षा भोगावी लागेल. सोबतच असे कार्य करणाऱ्या डॉक्टर चा दवाखाना व लायसेन्स रद्द करण्यात येईल.  म्हणून आज प्रत्येक दवाखान्यात मोठ्या अक्षरात लिहिलेले असते की स्त्री भ्रूण हत्या व लिंग तपासणे कायद्याने दंडनीय अपराध आहे. शासनाच्या या प्रयत्नामुळेच आज आपल्या देशातील स्त्रियांची स्थिती सुधारत आहे. व स्त्री देखील पुरुषांप्रमाणेच खांद्याला खांदा लावून कार्य करीत आहे.

--लेखक-मोहित पाटील
--------------------

                  (साभार आणि सौजन्य-संदर्भ-भाषण मराठी.कॉम)
                 -------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-24.02.2023-शुक्रवार.
=========================================