कसा राहू तुझ्याशिवाय?

Started by Jai dait, September 13, 2010, 11:19:59 AM

Previous topic - Next topic

Jai dait

कसा राहू तुझ्याशिवाय
एक क्षण ही असा जात नाही
जेव्हा तुझी आठवण येत नाही

पण तू मला दिलं काय?

फक्त तुझ्या आठवणी
ज्या छळतात मला क्षणोक्षणी

दिल्यास फक्त जखमा
ज्या हृदयात केल्यात जमा

संपता न संपणारी रात्र
जी उसासे भरते मात्र

या आयुष्याच्या तराजूत
तू दिलेल्या दुःखाचंच पारडं जड आहे,
तरीही तुझ्याशिवाय जगणं अवघड आहे...

  --जय