गीत मोडलेल्या आयुष्याचे

Started by vishal maske, February 25, 2023, 07:22:43 PM

Previous topic - Next topic

vishal maske

~!!! गीत मोडलेल्या आयुष्याचे  !!! ~

माझ्याच पाऊलखुणा, मोडत मी जात होतो
मोडलेल्या आयुष्याचे, गीत मी गात होतो

त्यात नव्हता भाव काही
त्यात नव्हता डाव काही
जे मी आज मोडत होतो
ते होते माझेच नाव काही

माझ्याच बरबादी चा, मी जणु कात होतो
मोडलेल्या आयुष्याचे, गीत मी गात होतो

ना कुणीही माझे होते
ना कुणाचे ओझे होते
आपुलकीच्या उंची वाले
आज स्वार्थापुढे खुजे होते

त्यांचा स्वार्थही मी, घटघटा पीत होतो
मोडलेल्या आयुष्याचे, गीत मी गात होतो

या मोडलेल्या आयुष्याचा
यमक आज हुकला आहे
आणि आयुष्य जगण्याचा
हा अंदाज ही चुकला आहे

माझी जीभ चावणारा, मीच जणु दात होतो
मोडलेल्या आयुष्याचे, गीत मी गात होतो

हा धडा शिकण्यासाठी
कित्येक धडे घ्यावे लागले
गोड वाटणारे  कडवट घोट
कित्येक घडे प्यावे लागले

तरी सुखाची वाट, अधाशीपणे पहात होतो
मोडलेल्या आयुष्याचे, गीत मी गात होतो

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.

कविता ऐकण्यासाठी व्हाट्सएप नंबर :- 9730573783