कुमार मराठी विश्वकोश-अंडाशय-२ (Ovary)

Started by Atul Kaviraje, February 27, 2023, 10:36:37 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                "कुमार मराठी विश्वकोश"
                               -----------------------


मित्र/मैत्रिणींनो,

     "कुमार मराठी विश्वकोश", या विषया-अंतर्गत आज वाचूया कुमारांसाठी एक महत्त्वाचा शैक्षणिक लेख. या लेखाचा विषय आहे- अंडाशय-२ (Ovary).

                                  "अंडाशय-२ (Ovary)"
                                 ----------------------

                  वनस्पतीचे अंडाशय--

     सपुष्प वनस्पतीच्या लैंगिक प्रजननासाठी दोन भिन्नलिंगी पेशींची गरज असते. त्यांपैकी स्त्रीलिंगी पेशी ज्या ग्रंथीमध्ये तयार होते त्या ग्रंथीला 'अंडाशय' अथवा 'किंजपुट' म्हणतात. फुलाच्या जायांगाच्या तळाचा भाग म्हणजे अंडाशय. अंडाशयाच्या आत भ्रूणकोश असतो. त्यामध्ये बीजांडे असतात. प्रत्येक बीजांडामध्ये अंड असते. परागण झाल्यानंतर कुक्षीवृंत्तामधून परागनलिका वाढते आणि बीजांडामध्ये शिरते. भ्रूणकोशाजवळ आल्यानंतर परागनलिकेचे टोक फुटते आणि पुंयुग्म मोकळे होतात. त्यांपैकी एक पुंयुग्म आणि अंड यांचा संयोग होऊन युग्मनज तयार होतो. फलनानंतर जायांगामध्ये बदल होतात आणि अंडाशयापासून फळ तयार होते.

======================
अंडाशय-२ (Ovary)
Post published:26/08/2019
Post author:प्रतिभा दीक्षित
Post category:कुमार विश्वकोश / वनस्पती
======================

--मराठी विश्वकोश
----------------

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-कुमार मराठी विश्वकोश)
                   ----------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-27.02.2023-सोमवार. 
=========================================