मला आवडलेला निबंध-निबंध क्रमांक-136-लोकसंख्या वाढ: कारणे, दुष्परिणाम & उपाय

Started by Atul Kaviraje, March 01, 2023, 09:45:24 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                  "मला आवडलेला निबंध"
                                     निबंध क्रमांक-136
                                 ----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला निबंध", या निबंध-मालिकेतील एक महत्त्वाचा निबंध. या निबंधाचे शीर्षक आहे- "लोकसंख्या वाढ: कारणे, दुष्परिणाम & उपाय"

     2011 च्या जनगणनेनुसार भारताची एकूण लोकसंख्या 125 कोटी आहे. ही लोकसंख्या जगाच्या एकूण लोकसंख्येच्या 17.5% आहे. आपला देश भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश चीन (134.1 कोटी) नंतर दुसरा देश आहे. भारताची एकूण लोकसंख्या अमेरिका, जपान, इंडोनेशिया, ब्राझील, पाकिस्तान या सर्व देशांच्या एकूण लोकसंख्या एवढी आहे व ही लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

     1941 साली भारताची लोकसंख्या 31.86 कोटी होती. आणि 2011 येईपर्यंत ही लोकसंख्या 121 कोटी झाली. आजची हालत अशी आहे की जगातील सहा व्यक्तीं मधून एक व्यक्ती भारतीय आहे. भारतात होत असलेल्या जनसंख्या विस्फोटावर जर आळा घातला नाही तर, तज्ञांच्या मते 2030 पर्यंत भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनून जाईल.

               लोकसंख्या म्हणजे काय ?--

     कोणत्याही देशातील शहर, जिल्हे, तालुके आणि खेड्या गावात राहणाऱ्या लोकांच्या एकूण संख्येला देशाची लोकसंख्या म्हटले जाते. गरजेपेक्षा जास्त लोकसंख्या वाढल्याने देश व संपूर्ण जगाला याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. पुढे आम्ही loksankhya vadhiche parinam आणि लोकसंख्या कमी करण्यासाठीचे काही उपाय सांगितले आहेत.

            लोकसंख्या वाढ म्हणजे काय आहे ?--

     कोणत्याही देशातील, शहर आणि क्षेत्रातील लोकांची संख्या वाढणे म्हणजेच लोकसंख्येची वाढ होय. लोकसंख्यावाढ ही भारतासह जगभरा समोरील मोठी समस्या आहे.

     लोकसंख्यावाढीची व्याख्या सोप्या शब्दात सांगायची झाली तर जेव्हा देशातील मृत्यु दरात कमी येते व जन्मदर वाढतो तेव्हा मोठ्या प्रमाणात लोकसंख्येत वृद्धि होते या स्थितीला 'लोकसंख्या विस्पोट' देखील म्हटले जाते. 

--लेखक-मोहित पाटील
--------------------

                  (साभार आणि सौजन्य-संदर्भ-भाषण मराठी.कॉम)
                 -------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-01.03.2023-बुधवार.
=========================================