०२-मार्च-दिनविशेष

Started by Atul Kaviraje, March 02, 2023, 10:06:18 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०२.०३.२०२३-गुरुवार. जाणून घेऊया,आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"

                                     "०२-मार्च-दिनविशेष"
                                     -------------------

-: दिनविशेष :-
०२ मार्च
=========================================
अ) महत्त्वाच्या घटना:
   ----------------
२००१
मध्य अफगाणिस्तानातील बामिया शहराजवळ प्राचीन आणि अमूल्य ठेवा असलेल्या सुमारे ६,००० बुद्ध मूर्ती धर्मबाह्य ठरवून मूलतत्त्ववादी तालिबानने उखळी तोफा आणि रणगाड्यांच्या साहाय्याने उद्‍ध्वस्त करण्यास सुरूवात केली.
१९६९
फ्रेन्च बनावटीच्या 'कॉन्कॉर्ड' या पहिल्या स्वनातीत (ध्वनीपेक्षा अधिक वेगाने जाणार्‍या) विमानाचे यशस्वी उड्डाण
१९७८
स्वित्झर्लंडमधील दफनभूमीतुन चार्ली चॅप्लिनची शवपेटिका चोरीला गेली.
१९७०
ब्रिटनकडून स्वातंत्र्य घेऊन र्‍होडेशिया प्रजासत्ताक बनले.
१९५६
मोरोक्‍कोला फ्रान्सकडून स्वातंत्र्य मिळाले.
१९५२
पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते सिंद्री (धनबाद, झारखंड) येथील खत कारखान्याचे उद्‍घाटन झाले. हा भारतातील पहिला खत कारखाना आहे.
१९४६
हो ची मिन्ह यांची उत्तर व्हिएतनामचे अध्यक्ष म्हणून नेमणूक झाली.
१९०३
मार्था वॉशिंग्टन हॉटेल
२००३ मधील छायाचित्र
फक्त महिलांसाठी असलेले 'मार्था वॉशिंग्टन हॉटेल' हे जगातील पहिले हॉटेल न्यूयॉर्क मधे सुरू झाले.
१८५७
जे. जे. स्कूल ऑफ आर्ट सुरू झाले.
१८५५
अलेक्झांडर (दुसरा) हा रशियाचा झार बनला.
=========================================
ब) जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  -----------------------------
१९७७
अँड्र्यू स्ट्रॉस – इंग्लिश क्रिकेटपटू
१९३१
राम शेवाळकर – मराठी साहित्यिक
(मृत्यू: ३ मे २००९)
१९३१
मिखाईल गोर्बाचेव्ह – सोविएत संघाचे शेवटचे अध्यक्ष आणि नोबेल पारितोषिक विजेते
१९२५
शांता जोग
शांता जोग – चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेत्री
(मृत्यू: १२ सप्टेंबर १९८०)
१७४२
विश्वासराव – पानिपतच्या ३ र्‍या युद्धात मारले गेलेले नानासाहेब पेशव्यांचे ज्येष्ठ चिरंजीव
(मृत्यू: १४ जानेवारी १७६१)
=========================================

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-02.03.2023-गुरुवार.
=========================================