कुमार मराठी विश्वकोश-अंत:स्रावी ग्रंथी (Endocrine glands)

Started by Atul Kaviraje, March 02, 2023, 10:43:21 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                  "कुमार मराठी विश्वकोश"
                                 -----------------------


मित्र/मैत्रिणींनो,

     "कुमार मराठी विश्वकोश", या विषया-अंतर्गत आज वाचूया कुमारांसाठी एक महत्त्वाचा शैक्षणिक लेख. या लेखाचा विषय आहे- अंत:स्रावी ग्रंथी (Endocrine glands).

                         "अंत:स्रावी ग्रंथी (Endocrine glands)"
                        -------------------------------------

               मानवी काही अंत:स्रावी ग्रंथी--

     यौवनलोपी किंवा हृदोधिष्ठ : ही ग्रंथी हृदयाजवळ छातीच्या पिंजर्‍यात असते. या ग्रंथीतून निर्माण होणार्‍या थायमोसिन या संप्रेरकामुळे प्रतिकारशक्ती निर्माण करणार्‍या पेशींची संख्या वाढते व टी पेशी परिपक्व होतात. त्यामुळे प्रतिकारशक्ती वाढते. ही ग्रंथी यौवन प्रारंभानंतर आकाराने लहान होत जाते.

     स्वादुपिंड : या ग्रंथीत लांगरहान्स द्वीपकातील पेशी संप्रेरके निर्माण करतात. लांगरहान्सची द्वीपके दहा लाख असून प्रत्येक द्वीपकात ३,००० पेशी असतात. या पेशी चार प्रकारच्या असतात : (अ) आल्फा पेशी २० % असतात व त्या ग्लुकागॉन संप्रेरक निर्माण करतात. यामुळे यकृतातील ग्लायकोजेनाचे ग्लुकोजामध्ये रूपांतर होते. (आ) बीटा पेशी ७० % असतात. त्या इन्शुलिनाची निर्मिती करतात. त्यामुळे रक्तातील साखर कमी होते.  (इ)   डेल्टा पेशी ५ % असतात व त्या सोमॅटोस्टॅटिन हे संप्रेरक उत्पन्न करतात. सोमॅटोस्टॅटिन हे इन्शुलीन व ग्लुकागॉनवर नियंत्रण ठेवते. तसेच आतड्यातील ग्लुकोजाचे शोषण व हालचाल यांवरही नियंत्रण ठेवते. (ई) पी.पी. पेशी ५ % असून स्वादुपिंडीय पॉलिपेप्टाइडाची निर्मिती करतात. या पेशी पाचकरसावर नियंत्रण ठेवतात.

     अधिवृक्क : या ग्रंथीचे 'बाह्यक' व 'मध्यक' असे दोन भाग असून ते भ्रूणाच्या निरनिराळ्या थरापासून निर्माण होतात. बाह्यकापासून तीन संप्रेरके निर्माण होतात : (अ) क्षार नियंत्रक, (आ) प्रथिने, कर्बोदके व मेद यांच्या चयापचयाचे नियंत्रक. (इ) जननग्रंथी, पोषक आणि मध्यकातून अ‍ॅड्रेनॅलीन किंवा नॉरअ‍ॅड्रेनॅलीन ही संप्रेरके स्रवतात. ही संप्रेरके आणीबाणीच्या किंवा भावनिक प्रसंगी स्रवतात आणि हृदय व संवहनी संस्थेला उद्दीपित करतात. अ‍ॅड्रेनॅलिनामुळे चयापचय क्रियांनाही उत्तेजन मिळते व रक्तातील शर्करेचे प्रमाण वाढते. म्हणून अधिवृक्क ग्रंथीला 'आणीबाणीची ग्रंथी' म्हणतात.

     वृषणग्रंथी व (९) अंडाशय : पुरुषांमध्ये वृषणग्रंथी टेस्टोस्टेरॉन आणि स्त्रियांमध्ये अंडाशय इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन ही संप्रेरके निर्माण करतात. ही संप्रेरके प्रजननाचे कार्य चालू ठेवतात.

     अधश्चेतक : ही मेंदूतील ग्रंथी असून तिच्यात स्वायत्त चेतासंस्थेची प्रमुख केंद्रे असतात. शरीरातील तापमान, पाणी, क्षार व ग्लुकोज यांचे प्रमाण संतुलित ठेवण्याची केंद्रे या ग्रंथीत असतात. ही ग्रंथी पीयूषिकेचेही नियंत्रण करते. ही पीयूषिकेला जोडलेली असून हिच्यापासूनचा स्राव पीयूषिकेतील स्राव निर्माण करणार्‍या पेशींना उत्तेजित करतो.

====================
अंत:स्रावी ग्रंथी (Endocrine glands)
Post published:26/08/2019
Post author:शशिकांत प्रधान
Post category:कुमार विश्वकोश/वैद्यक
====================

--मराठी विश्वकोश
----------------

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-कुमार मराठी विश्वकोश)
                   ----------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-02.03.2023-गुरुवार.
=========================================