रिक्त ओंजळीवर आधारित कविता-आज तुझी ओंजळ भरलेली असेल, उद्या तिचं तुला रिक्त भासेल

Started by Atul Kaviraje, March 02, 2023, 11:08:00 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला, रिकाम्या ओंजळीवर आधारित कविता-गीत ऐकवितो. "अरे देखी ज़माने की यारी, बिछड़े सभी बारीबारी"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपली फेब्रुवारी महिन्याची ही   गुरुवार-रात्र आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे-(अरे देखी ज़माने की यारी, बिछड़े सभी बारीबारी)
----------------------------------------------------------

              "आज तुझी ओंजळ भरलेली असेल, उद्या तिचं तुला रिक्त भासेल !"
            -----------------------------------------------------------

आज तुझी ओंजळ भरलेली असेल,
उद्या तिचं तुला रिक्त भासेल !
नशिबाने दिलय तुला भरभरून आज,
उद्या नशीबच फासा पलटवून टाकेल.

आज तुझी ओंजळ भरलेली असेल,
उद्या तिचं तुला रिक्त भासेल !
खाली हाती आलास, रिकामाच जाशील,
काही नाही आणलेस, काय घेऊन जाशील ?

लोक भेटतात, थोड्या काळासाठी मोह लावतात
निघून जातात, थोड्या काळाचे सोबती असतात
कोणी नसत आपलं इथे, नाती नावालाच असतात,
बिछडल्यावर एकटं राहण्यास भाग पाडतात.

ही दुनिया काहीच देत नसते, फक्त घेत असते
हिसकावून घेत, आपली ओंजळ रिकामीच ठेवत असते
द्यायला फक्त अश्रुंचे दान मात्र हमखास देते, 😢
लुबाडून घेत, हसऱ्या माणसाला सतत रडत ठेवते. 😂

काही नाही, मतलबीच आहे हे जग, स्वार्थीच आहे
अगदीच नाही, स्वार्थी माणसांची इथे गर्दीच आहे
फुलं देण्याच्या नावाखाली, काट्यांची पखरण करतात,
अमृत पाजण्याचा नावाखाली विषाची उधळण करतात.

वेळ आहे मेहेरबान इथे, इच्छा आहेत तरुण इथे
कुणाला फुरसतच नाही, रंगरलीयाचा जमाना आहे इथे
असाच दौर सुरु राहतो, असाच काळ जात असतो,
यौवनावर ओवाळून टाकण्यास जाम नेहमीच बदलत असतो. 🥂

रात्रीची ही रंगढंग असते, रात्रीचीच संग असते
सारे रात्रीचे पाहुणे असतात, हे फक्त बहाणे असतात
रात्र ओसरली की तेच सारे मग शहाणे होतात,
ख़ुशी नाममात्र असते, सारे मग मार्गावर येतात.

क्षणिक आनंदाला हे अगणित समजून जातात
याचे गणित मांडता मांडता जीवन हरवून बसतात
बेकरारी वाढत जाते, बेचैनी हद्द पार करते,
समजून घेता घेता, त्यांची उमर पार होते.

अरे मधुकरा या बागेत बघ, बहरच नाही
बा मधुकरा, या फुलामंध्ये मकरंदच नाही
ही फुले कागदी आहेत, ते ओळखण्यास शिक, 🍀
फुलांचे रंग केव्हाच फिके झालेत, ते पारखण्यास शिक.

मूर्ख माणसा, ज्याला नदी समजतोस, ते वाळवंटचं आहे
त्यात आपले तारू तू वल्हवू नकोस, ते रुतायचेच आहे
तुझी उमंग, तुझी उमेद, तुझा उत्साह हा सर्व फुकाचं आहे,
तुझी ख़ुशी, तुझा आनंद, तुझी ऊर्जा ही सर्व वृथाच आहे.

हे जग तुला देईल ओंजळ भरून एका हाताने
नंतर तुलाच लुटेल ते भरभरून अनंत हाताने
हा खेळ आधीही सुरु होता, आज आहे, उद्याही असेल,
शहाणा हो, तुझी ओंजळ शेवटी रिकामीच असेल.

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-02.03.2023-गुरुवार.
=========================================