कुमार मराठी विश्वकोश-अंत:स्रावी ग्रंथी (Endocrine glands)

Started by Atul Kaviraje, March 03, 2023, 10:39:41 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                 "कुमार मराठी विश्वकोश"
                                -----------------------


मित्र/मैत्रिणींनो,

     "कुमार मराठी विश्वकोश", या विषया-अंतर्गत आज वाचूया कुमारांसाठी एक महत्त्वाचा शैक्षणिक लेख. या लेखाचा विषय आहे- अंत:स्रावी ग्रंथी (Endocrine glands).

                        "अंत:स्रावी ग्रंथी (Endocrine glands)"
                       --------------------------------------

               मानवी काही अंत:स्रावी ग्रंथी--

     जठर व आतड्यातील ग्रंथी : या ग्रंथी जठराच्या व आतड्याच्या श्लेष्मल पटलात असतात. आतड्यातील हालचालींवर व अन्नशोषणावर या ग्रंथी नियंत्रण ठेवतात.

     मूत्रपिंड (वृक्क) :  मूत्रपिंडे तीन संप्रेरके निर्माण करतात : (अ) रेनीन : हे सोडियमच्या पातळीवर नियंत्रण ठेवते. संप्रेरकामुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात व रक्तदाब वाढतो. (आ) एरिथ्रोपोएटिन : या संप्रेरकामुळे अस्थिमगजात तांबड्या रक्तपेशी उत्पन्न होण्यास चालना मिळते. (इ) कॅल्शिट्रिऑल : यामुळे लहान आतड्यात कॅल्शियम व फॉस्फरस शोषले जाऊन हाडांची वाढ होते.

     वार : गर्भवती स्त्रीच्या गर्भाशयाला गर्भ (भ्रूण) ज्यामुळे जोडलेला असतो ती वार तात्पुरती अंतःस्रावी ग्रंथी म्हणून कार्य करते. गर्भाच्या वाढीसाठी व गरोदरपण व्यवस्थित पार पाडण्यासाठी आवश्यक संप्रेरकाची निर्मिती ही ग्रंथी करते.

     बहुधा, एक किंवा अनेक ग्रंथींद्वारा अतिस्रावामुळे किंवा अल्पस्रावामुळे अंतःस्रावी संस्थेचे रोग निर्माण होतात. संप्रेरकाच्या अतिस्रवण्याने शरीरात अर्बुद होतात किंवा पेशींची अभिवृध्दी होते. पीयूषिकेपासून पाझरणार्‍या संप्रेरकामुळे काही अंतःस्रावी ग्रंथी अतिस्राव किंवा अल्पस्राव पाझरतात. अल्पस्राव होण्यामागे शस्त्रक्रियेमुळे किंवा प्रारणांमुळे ऊतींचा नाश, ऊतींचा क्षय, आहार व संप्रेरक निर्मितीसाठी आवश्यक असणार्‍या विकरांमध्ये जन्मजात दोष, इ. कारणे असतात. मानवाप्रमाणेच सस्तन प्राण्यांमध्ये अंत:स्रावी संस्थेत अधश्चेतक, पीयूषिका, तृतीय-नेत्रपिंड, अवटू, परावटू, यौवनलोपी, स्वादुपिंड, अधिवृक्क, वृषण, अंडाशय इ. ग्रंथींचा समावेश होतो. अपृष्ठवंशीय प्राण्यांमध्येही काही ग्रंथी असतात, मात्र त्या बहुतांशी चेतापेशींचे गुच्छच असतात. उदा., संधिपाद (ऑर्थोपोडा)  प्राण्यांमध्ये डोळ्यात, मेंदूत आणि गंडिकांमध्ये अशा गुच्छवजा ग्रंथी असतात. त्यांच्यामुळे प्रजनन, कात टाकणे, शरीरातील पाण्याचे संतुलन, रक्तातील ग्लुकोजाची पातळी आणि हृदयाचे ठोके इ. क्रियांचे नियमन होते. संधिपादांमध्ये अंडाशय तसेच नरसंप्रेरक पाझरणारी ग्रंथी अशा अंत:स्रावी ग्रंथी असतात.

=====================
अंत:स्रावी ग्रंथी (Endocrine glands)
Post published:26/08/2019
Post author:शशिकांत प्रधान
Post category:कुमार विश्वकोश / वैद्यक
=====================

--मराठी विश्वकोश
----------------

                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-कुमार मराठी विश्वकोश)
                  ----------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-03.03.2023-शुक्रवार.
=========================================