एकाकीपणावर कविता-गीत-एकाकीपण मला खायला उठलंय, कुणीतरी आज सोबतीला हवंय !

Started by Atul Kaviraje, March 05, 2023, 06:37:55 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला, एकाकीपणावर कविता-गीत ऐकवितो. "अकेले हैं चले आओ जहाँ हो, कहाँ आवाज़ दे तुमको कहाँ हो"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपली फेब्रुवारी महिन्याची ही सायंकाळ-रविवार आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे-( अकेले हैं चले आओ जहाँ हो, कहाँ आवाज़ दे तुमको कहाँ हो)           
----------------------------------------------------------------------

            "एकाकीपण मला खायला उठलंय, कुणीतरी आज सोबतीला हवंय !🚻"
           ------------------------------------------------------------

एकाकीपण मला खायला उठलंय,
कुणीतरी आज सोबतीला हवंय ! 🚻
एकटेपणाचे दुःख मी कुणाला सांगू ?
साथीला आज कुणीतरी हवंय ! 🚻

एकाकीपण मला खायला उठलंय,
कुणीतरी आज सोबतीला हवंय ! 🚻
कितीतरी वर्षे उलटून गेलीत,
पुन्हा एकटं एकटं वाटू लागलंय ! 😒

आवाज देऊन थकलोय मी
तुला शोधता दमलोय मी
नाही तुझा भास, नाही आभास,
नाही तुझी जवळीक, नाही सहवास.

कंठ माझा दाटून येतोय
आवाज माझा क्षीण होतोय
तुला का तो ऐकू येतोय ?
का नुसताच प्रतिध्वनी उमटतोय ?

असं वाटतंय, कितीतरी युगे लोटलीत
फिरून फिरून पावलेही थकलीत 👣
आता मनही निरुत्साही होतंय, 😒
तुला शोधता हतोत्साहित होतंय.

माझे सर्वच मार्ग खुंटलेत आता
माझे सर्व रस्तेच संपलेत आता
माझ्या नजरेआड अजुनी आहेस तू,
कोण जाणे, का खफा आहेस तू ?

डोळ्यांना माझ्या अधूपण येत चाललंय 👀
डोळ्यांना माझ्या अंधत्त्व येत चाललंय 👀
तुझा काहीच हास नाही, भास नाही,
तुझं अस्तीत्व नजरेआड होत चाललंय.

दिसतंय ते विराण वाळवंटच आहे
दिसतंय ते नुसतं मृगजळच आहे
मंजिल धूसर होत चाललीय,
नजरेच्या टप्प्यातून ओझल होत चाललीय.

सारं कसं उदास, भकास वाटतंय 😒
सारं कसं निष्प्राण, वैराण वाटतंय
मनातल्या भावना मनातच कोंडून गेल्यात,
मनाच्या संवेदना मनातच दडून गेल्यात. 😒

हा एकटेपणा आणि वर तुझं दुःख
दोन्हीही गेल्यात मजला ग्रासून
बधिर मन, बोथट मन, भावनाशून्य मन,
झालोय हवालदिल, यांनीच गेलोय मी त्रासून.

जगताही येत नाही, मरणही येत नाही
तुझी आठवण मला निजू देत नाही
माझी ही कैफियत कुणाला सांगू ?
तू नसल्याचे दुःख मी कुणाला सांगू ?

असं हे एकाकीच जीवन जगायच यापुढेही
पावले ओढीत रस्ता शोधायचा यापुढेही 👣
मनाला अजुनी तुझी ओढ आहे,
पावलांना अजुनी तुझी ओढ आहे. 👣

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-05.03.2023-रविवार.
=========================================