०५-मार्च-दिनविशेष

Started by Atul Kaviraje, March 05, 2023, 10:11:15 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०५.०३.२०२३-रविवार. जाणून घेऊया,आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"

                                    "०५-मार्च-दिनविशेष"
                                   --------------------

-: दिनविशेष :-
०५ मार्च
समता दिन
=========================================
अ) महत्त्वाच्या घटना:
   ----------------
२०००
पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते कर्नाटकातील कैगा अणूवीजप्रकल्प (युनिट - २) राष्ट्राला अर्पण
१९९९
'इंडियन फिजिक्स असोसिएशन' तर्फे देण्यात येणार्‍या आर. डी. बिर्ला स्मृती पारितोषिकासाठी डॉ. जयंत नारळीकर व प्रा. अशोक सेन यांची निवड
१९९८
नेहमीच्या अस्त्रांबरोबरच कमी पल्ल्याची विमानभेदी क्षेपणास्त्रे सोडू शकणार्‍या, रशियाकडुन घेतलेल्या 'सिंधुरक्षक' या पाणबुडीचे मुंबई येथे आगमन
१९९७
ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीच्या सप्तशताब्दीच्या सांगतेनिमित्त राष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा यांच्या हस्ते ज्ञानेश्वरांची प्रतिमा असणार्‍या टपाल तिकिटाचे प्रकाशन
१९६६
मैसूरचे माजी संस्थानिक जयचामराजेन्द्र वडियार यांचा बंगळूर येथील राजवाडा व त्यासभोवतालची जागा राज्य सरकारच्या ताब्यात घेण्याची परवानगी देणारे विधेयक कर्नाटक विधानसभेत संमत
१९३३
भयानक मंदीमुळे आदल्या दिवशीच कार्यभार सांभाळलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी. रुझव्हेल्ट यांनी सर्व बँका काही दिवसांसाठी बंद केल्या व आर्थिक व्यवहारांवर बंदी घातली.
१९३१
दुसर्‍या गोलमेज परिषदेपुर्वी गांधी-आयर्विन करार झाला.
१६६६
छत्रपती शिवाजीमहाराजांनी राजगडावरून आग्र्यास प्रयाण केले.
१८५१
'जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया'ची (GSI) स्थापना
१५५८
फ्रॅन्सिस्को फर्नांडीस याने धूम्रपानासाठी सर्वप्रथम तंबाखूचा वापर केला.
=========================================
ब) जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  -----------------------------
१९१६
बिजू पटनायक – ओरिसाचे मुख्यमंत्री, केन्द्रीय पोलाद, खाणकाम आणि कोळसा मंत्री
(मृत्यू: १७ एप्रिल १९९७)
१९१३
गंगूबाई हनगळ – किराणा घराण्याच्या शास्त्रीय गायिका
(मृत्यू: २१ जुलै २००९)
१९१०
श्रीपाद वामन काळे – अर्थतज्ञ व लेखक, मराठी भाषेतील पहिल्या अर्थविषयक नियतकालिकाचे संपादक. 'तुमचे स्थान कोणते', 'कौटुंबिक हितगुज', 'दाणे आणि खडे', 'नवी घडी नवे जीवन', 'नव्या जीवनाची छानदार घडी' इत्यादि पुस्तकाचे लेखन त्यांनी केले.
(मृत्यू: २६ मे २०००)
१९०८
सर रेक्स हॅरिसन – ब्रिटिश तसेच अमेरिकन रंगभूमीवरील आणि हॉलिवूड चित्रपटांतील अभिनेते. त्यांनी 'शालीमार' या एका हिंदी चित्रपटातही भूमिका केली होती.
(मृत्यू: २ जून १९९०)
१८९८
चाऊ एन लाय – चीनचे राष्ट्राध्यक्ष
(मृत्यू: ८ जानेवारी १९७६)
१५१२
गेरहार्ट मरकेटर – नकाशाकार, गणितज्ञ आणि तत्त्वज्ञ
(मृत्यू: २ डिसेंबर १५९४)
=========================================
क) मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
    -------------------------
२०१३
ह्युगो चावेझ – व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष
(जन्म: २८ जुलै १९५४)
१९९५
जलाल आगा – चरित्र अभिनेता
(जन्म: ११ जुलै १९४५)
१९८९
बाबा पृथ्वीसिंह आज़ाद – क्रान्तिकारी स्वातंत्र्यसैनिक, गदर पार्टीचे एक संस्थापक
(जन्म: ? ? ????)
१९८५
डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे – 'महाराष्ट्र संस्कृती'कार
(जन्म: १० जून १९८५)
१९६८
नारायण गोविंद चाफेकर – भाषातज्ज्ञ, संशोधक, लेखक, समीक्षक, समाजशास्त्रज्ञ, ग्रंथकार व कोशकार
(जन्म: ५ ऑगस्ट १८६९)
१९६६
शंकरराव शांताराम मोरे – समाजवादी व साम्यवादी विचाराचे व्यासंगी नेते, पुणे जिल्हा स्कूल बोर्डाचे अध्यक्ष, तिसऱ्या लोकसभेतील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे खासदार (पुणे मतदारसंघ)
(जन्म: ? ? ????)
१९५३
जोसेफ स्टालिन
जोसेफ स्टालिन – सोविएत रशियाचे राष्ट्राध्यक्ष
(जन्म: १८ डिसेंबर १८७८)
१८२७
अलासांड्रो व्होल्टा – इटालियन भौतिकशास्त्रज्ञ
(जन्म: १८ फेब्रुवारी १७४५)
=========================================

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-05.03.2023-रविवार.
=========================================